Nana Patole: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार! पाच नावं स्पर्धेत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करून नव्या नेत्यावर जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात मधल्या काळात पक्षातीलच काही नेत्यांनी नाराजीचा सूर लावला होता. हे प्रकरण काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत गेलं होतं. तेव्हापासूनच महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली होती.
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र काँग्रेसमधील गटबाजी समोर आली होती. हे प्रकरण काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत गेलं होतं. तेव्हापासूनच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्वा बदलाची चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी नवा चेहरा येईल असं सांगण्यात येत असून, यासाठी काही नाव स्पर्धेत आहेत. ‘लोकमत’ने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होणार असल्याबद्दलचे वृत्त दिलं आहे.
हेही वाचा >> Exclusive: तांबे, पटोले की थोरात… अशोक चव्हाणांनी नेमकं कोणाला सुनावलं?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल काँग्रेसमधील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठीकडे आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी आणि आपसातील राजकारण समोर आलं होतं.
आमदार सत्यजित तांबे यांनी थेट नाव न घेता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ठपका ठेवला होता. त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांनी पत्र लिहून काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त करत पटोलेंसोबत काम करणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये मोठे फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.