‘…तर एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही’, मलंगगडावरून मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
मलंगगडाची चळवळ ही आजची नाही तर ती चळवळ धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून सुरु आहे. ती चळवळ आजही लोकांनी चालू ठेवल्याने आता मलंगगड मी मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
दीपेश त्रिपाठी/ ठाणे : मलंगगडावर कालपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी मलंगडाला मुक्त करण्याचे अश्वासन देत हे केल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नसल्याचे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या मलंगडावर गेल्या अनेक वर्षापासून हिंदू-मुस्लिम वाद सुरु आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण काढत आनंद दिघे यांनी अनेक वर्षांपूर्वी मलंगगड मुक्तीसाठी चळवळ सुरू केली होती. त्यांच्या नंतरही हे आंदोलन सुरुच आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या भावना मला समजल्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले. .
ADVERTISEMENT
दीर्घकाळाची इच्छा
यावेळी त्यांनी मलंगगडला मुक्त करण्याचे अश्वासनही दिले आहे. हे केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हटल्याने त्यातून आता नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या आंदोलनाची आठवणही सांगितली. मलंग दर्ग्याचे मलंगगड नाहीतर श्री मलंगमध्ये रूपांतर करण्याची दीर्घकाळाची इच्छा नागरिकांची असल्याचेह त्यांनी सांगितले. त्यामुळे मलंगगड आता मुक्त झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही जाहीरपणे त्यांनी बोलून दाखवले.
हे ही वाचा >> ‘2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणं ही सर्वात मोठी चूक होती’
मलंगगड मुक्ती चळवळ
यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, तुम्ही दिलेल्या घोषणेवरून आता मला तुमच्या भावना समजल्या आहेत. काही वर्षापूर्वी धर्मवीर आनंद दिघे यांनी ही मलंगगड मुक्ती चळवळ सुरु केली होती. त्यांच्या या चळवळीमुळेच मलंगश्री त्याचा उल्लेख करू लागलो असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टी सगळ्यांना माहिती असल्या तरी काही गोष्टी आपण जाहिरपणे सांगू शकत नसल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
हे वाचलं का?
नव्या वादाची ठिणगी
यावेळी त्यांनी हेही सांगितले की, जाहिरपणे काही गोष्टी सांगू शकत नसलो तरी आपली जी भावना आहे, त्यामुळे मलंगगड मुक्त केल्याशिवाय एकनाथ शिंदे आता स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गेल्या कित्येक वर्षात राज्यात जे घडले नाही ते मी करुन दाखवले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्याचा संदर्भ दिल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा >> ‘बाबरी प्रकरण तुम्ही भडकवण्याचं…’ ओवेसींनी फडणवीसांवर थेट आरोपच केला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT