बृजभूषण सिंहचा पाय खोलात, दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात खळबळजनक आरोप

मुंबई तक

भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) बृजभूषण शरण सिंह (brij bhushan sharan singh) यांच्या अडचणी वाढण्याचा शक्यता आहेत. कारण दिल्ली पोलिसांच्या चार्जशीटनुसार सहा कुस्तीपटूंनी तक्रार दाखल केली होती.

ADVERTISEMENT

delhi police chargesheet against brij bhushan sharan singh women wrestler
delhi police chargesheet against brij bhushan sharan singh women wrestler
social share
google news

भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) बृजभूषण शरण सिंह (brij bhushan sharan singh) यांच्या अडचणी वाढण्याचा शक्यता आहेत. कारण दिल्ली पोलिसांच्या चार्जशीटनुसार सहा कुस्तीपटूंनी तक्रार दाखल केली होती. यामध्ये लैगिक छळ, छेडछाड आणि पाठलाग केल्याच्या आरोपाखाली खटला चालवून कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे असे म्हटले होते. 13 जून रोजी तयार करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये 506 (गुन्हेगारी), 354 (महिलेचा अपमान करणे), 354A (लैंगिक छळ), 354D (पाठलाग करणे) या चार कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता बृजभूषण सिंह यांचा पाय आणखीण खोलात जाण्याची शक्यता आहे.(delhi police chargesheet against brij bhushan sharan singh women wrestler)

पोलिसांच्या चार्जशीटमध्ये काय?

द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, चार्जशीटमध्ये असे लिहलेय की, आरोपीला खटल्याला सामोरे जाण्यासाठी बोलावण्यात यावे, तसेच साक्षिदारांना त्यांची साक्ष देण्यास सांगण्यात यावे, असे सांगितले होते. चार्जशीटमध्ये तपास अधिकाऱ्यांनी 108 जणांची साक्ष नोंदवली आहे. ज्यामध्ये 15 कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांचा पुनरूच्चार केला आहे. या 15 मध्ये कुस्तीपटू, कोच आणि रेफरीचा समावेश आहे. असे असले तरी बृजभूषण शरण सिंहने (brij bhushan sharan singh)हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच या कुस्तीपटूंना मी कधीच भेटलो नाही आहे, आणि त्यांच्याकडे माझा फोन नंबरही नसल्याचा दावा बृजभूषण सिंह यांनी केला आहे.

हे ही वाचा : Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : दानवे फडणवीसांना म्हणाले, “कावळ्यांची काविळ”

कुस्तीपटुंचा आरोप आहे की, लैंगिक छळाची 15 प्रकरणे आहेत. यामधील 10 प्रकरणात चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, धमकावणे, पाठलाग करण्याचे आरोप आहे. तसेच या चार्जशीटमध्ये दिल्ली पोलिसांनी अनेक साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये चार्जशीटमधील कुस्तीपटूचे आरोप आणि साक्ष छापली गेली आहे.

कुस्तीपटूंचे आरोप काय आहेत?

चार्जशीटमध्ये एका कुस्तीपटूने साक्ष नोंदवताना म्हटले की, मी रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती. आरोपीने मला डिनरच्या टेबलवर बोलावले होते. यावेळी आरोपीने त्याचा हात माझ्या छातीवर ठेवला आणि दाबला त्यानंतर पोटापर्यंत हात नेला. असे साधारण त्याने तीन-चार वेळा केले. तसेच कुस्ती महासंघाच्या कार्यालयात त्याने माझे तळवे, गुडघे, मांड्या, खांद्यावर मला माझ्या परवानगीशिवाय स्पर्श करायला सुरुवात केली. तसेच माझा श्वास तपासण्याच्या बहाण्याने छातीवर हात ठेवला आणि पोटापर्यंत नेला. या आरोपांची तीन कुस्तीपटूसह काही साक्षीदारांनी पुष्टी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp