‘बाप हा बाप असतो…’, आव्हाडांनी अजित पवारांना ठणकावून सांगितले
राजकारणातही निवृत्तीला काहा ठराविक वय आहे. मात्र, काही जण 84 वर्षे वय पूर्ण झाले तरी, काही जण थांबायला तयार नसल्याचे सांगत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली होती, त्यांच्या त्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची बाजू घेत बाप हा बापच असल्याचे सांगत त्यांच्यावर त्यांनी पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यामध्ये बोलताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) वयाचा मुद्या याआधीही उपस्थित केला होता. मात्र आजच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा वयाच्या मुद्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला. ‘वय झाल्यानंतर थांबायचे असते, पण काही जण ऐकत नाहीत असल्याचे टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी (NCP Jitendra Awhad)पलटवार करत बाप हा बाप असतो म्हणत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
वार पलटवार
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली होती. जरांगे पाटील यांना इशारा देताना मुंबईत येऊन कोणीही कायदा हात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. त्या मुद्यावरूनही जरांगे पाटलांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता शरद पवारांवर टीका केल्याने त्यांच्या टीकेला उत्तर देत जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
हे ही वाचा >> ‘अजित पवारांच्या पोटातलं ओठात आलं’, मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचा पलटवार
अजित पवार म्हणाले…
अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करताना म्हटले होते की, ‘सरकारी नोकरीत 58 व्या वर्षी निवृत्ती आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत 60 व्या वर्षी निवृत्ती होते. तर राजकारणातही निवृत्तीला काहा ठराविक वय आहे. मात्र, काही जण 84 वर्षे वय पूर्ण झाले तरी, काही जण थांबायला तयार नाहीत’, अशा शब्दात त्यांच्यावर त्यांनी टाकी केली होती.
हे वाचलं का?
बापाविना घर सुनंसु
अजित पवारांच्या त्या टीकेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार साधत अजितदादांना ठणकावून सांगितले आहे. ‘बापाला रिटायर करायचंच नसतं, बाप हेच उर्जा स्त्रोत असतं घरातील. आई बापाविना घर सुनंसुनं वाटायला लागतं म्हणत, बाप हा बाप असल्याचे ठणकावून सांगितले आहे. जितेंद्र आव्हाडांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिल्याने आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा >> ‘त्याची अवस्था कुत्र्यासारखी…’, हिंदुस्थानी भाऊची आव्हाडांवर बोचरी टीका
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT