”…म्हणून उद्धव ठाकरेंचे दुकान बंद पाडलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis criticize and reply udhhav thackeray shivsena maharahstra politics
devendra fadnavis criticize and reply udhhav thackeray shivsena maharahstra politics
social share
google news

Maharashtra Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी पदाधिकारी शिबीरातून देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. आता या टीकेचा समाचार देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. उद्धवजी तुम्हाला कुठे कुठे कशी कशी आग होतेय, हे तुम्हाला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, हे आम्हाला समजतंय, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर (udhhav thackeray) हल्लाबोल केला. (devendra fadnavis criticize and reply udhhav thackeray shivsena maharahstra politics)

2019 साली भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन, कॉग्रेस, राष्ट्रवादीसोबत खुर्चीच्या मोहाने तुम्ही गेलात, अशी टीका देखील फडणवीस यांनी ठाकरेंवर केली. यावेळी फडणवीसांनी शायरी देखील मारली, ”मेरा पाणी उतरात देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना”, ”में समुंदर हू लौटकर जरूर आऊंगा”, आणि मी परत तर आलोच, शिंदेनाही घेऊन आलोय, पण हे (उद्धव ठाकरे) अजूनही जागेच झाले नाही, रोज लोक यांचा पक्ष सोडून चालले आहेत. 40-40 आमदार नाकाखालून जातात आणि यांना समजतही नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची!”, फडणवीसांना डिवचलं

शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते, ”ज्या दिवशी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल,त्यादिवशी शिवसेनेची दुकान मी बंद करेन, पण त्यांच्यासोबत मी जाणार नाही”, पण खुर्ची करता उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले, म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचे दुकान बंद केले, आणि बाळासाहेबांचा पक्ष एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात पुन्हा जिवंत केला, जो हिंदुत्वाकरीता, शिवसेनेच्या रूपाने मजबूतीने उभा आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मोदी-शहा यांच्यावरील टीकेचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरे, मोदी,शहांबदद्ल काय काय बरळले, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू, अशा शब्दात देखील फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. तसेच नरेद्र मोदी त्या व्यक्तीचे नाव आहे, ज्याने अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारलं, ज्या औरंगजेबाने भगवान विश्वनाथचे मंदिर तोडण्याचे पाप केले, त्या काशी विश्वनाथ मंदिराला उभारण्याचे काम नरेंद्र मोदींनी करून दाखवलं, काश्मिरला भारतात विलिन करून 370 मोदींनी हटवले, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. अरे तुम्ही काय मुकाबला करणार मोदी आणि शहांचा, जे घऱी बसतात त्यांना अमित शाह काय माहिती, जे घरात बसून राजकारण करतात त्यांना मोदी काय माहिती, अशी टीका देखील फडणवीस यांनी ठाकरेवर केली.

हे ही वाचा :  ‘फडणवीसांचा शिवसेनेत प्रवेश’, संजय राऊतांनी मोदी-शाहांवर डागली तोफ

    follow whatsapp

    ADVERTISEMENT