“यात उद्धवजींचा काही दोष नाही”, चित्रा वाघ यांनी राऊतांकडे मागितला पुरावा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

devendra fadnavis sanjay raut kar seva photo war chitra wagh ask proof ram mandir inaugration
devendra fadnavis sanjay raut kar seva photo war chitra wagh ask proof ram mandir inaugration
social share
google news

Maharashtra politics : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा आहे. राम मंदिरावरून राजकारण चांगलंच तापले आहे. यातच झालं असं की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 1992 मधील अयोध्येला जातानाचा फोटो शेअर केला आणि संजय राऊत (Sanjay Raut) विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा राजकीय कलगीतुरा सुरु झाला. यात उडी मारली ती चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी! चित्रा वाघ यांनी राऊत यांच्याकडे पुरावाच मागितला. त्यामुळं हा मुद्दा आणखी वाढला आहे. (devendra fadnavis sanjay raut kar seva photo war chitra wagh ask proof ram mandir inaugration)

फडणवीसांचा जुना फोटो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर रेल्वे स्टेशनवरील एक फोटो ट्विट केला. या फोटोमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असंही फडणवीस म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राऊतांचा फडणवीसांना चिमटा

या जुन्या फोटोवरून संजय राऊत यांनी फडणवीस यांना चिमटा काढला. ‘त्यांच्याकडे रेल्वे स्टेशनवरील फोटो आहेत. आमच्याकडे बाबरीच्या घुमटावरील फोटो आहेत’, असं राऊत म्हणाले. त्यावर मुर्खांना मी उत्तर देत नाही, असं फडणवीस म्हणाले. यात चित्रा वाघ यांनी राऊतांवर शरसंधान साधलं.

चित्रा वाघ यांनी दिलं प्रत्युत्तर

भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या, “सर्वज्ञानी संजय राऊत. रामजन्मभूमी आंदोलनावेळी तुमच्यासारख्या घरात दडून बसलेल्यांनी देवेंद्रजींकडं पुरावे मागावेत, याच्या इतकी हास्यास्पद गोष्ट नाही.”

ADVERTISEMENT

पुढे वाघ असं म्हणतात की, “त्यांच्याकडे कारसेवा करण्यासाठी घराबाहेर पडल्याचे फोटो तरी दाखवायला आहेत. तुमच्याकडे उद्धवजींनी मातोश्रीचा उंबरा तरी ओलांडल्याचा पुरावा आहे का?”, असा सवाल त्यांनी राऊतांना केला.

ADVERTISEMENT

“हे सगळ्यांनाच माहितीये की तेव्हा उद्धवजी जेव्हा-केव्हा घराबाहेर पडायचे ते हेलिकॅाप्टरमध्ये बसून फोटो काढण्यासाठीच”, असा चिमटाही चित्रा वाघ यांनी काढला.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “त्यामुळे आताप्रमाणेच तेव्हाही त्यांचा जमिनी वास्तवाशी काहीही संबंध नव्हता त्यांचे डोळे आकाशातूनच जमिनीकडे भिरभिरायचे. त्यामुळे साहजिकच देवेंद्रजींसारख्या राम मंदिर आंदोलनाला वाहिलेल्या सच्चा कार्यकर्त्याचे योगदान त्यांची नजर टिपू शकली नाही यात उद्धवजींचा काही दोष नाही”, असे खोचक प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना दिलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT