Dilip Walse Patil : शरद पवारांबद्दल वळसे-पाटील असं बोलले, कारण…; वाचा खुलासा

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

dilip walse clarification on his remark about sharad pawar politics.
dilip walse clarification on his remark about sharad pawar politics.
social share
google news

Dilip Walse Patil Sharad pawar : ‘शरद पवार यांच्या उंचीचा दुसरा नेता देशामध्ये नाही, असं आपण म्हणतो; पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या एकट्याच्या ताकदीवर किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेनं एकदाही त्यांना बहुमत दिलं नाही. एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केलं नाही’, असं विधान दिलीप वळसे पाटील यांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर शरद पवार समर्थक नेत्यांनी टीकेची झोड उठवली. टीका झाल्यानंतर वळसे पाटलांनी खुलास केला आणि त्या वक्तव्या मागचं कारणही सांगितलं.

ADVERTISEMENT

शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाने दिलीप वळसे-पाटील चर्चेत आले. जितेंद्र आव्हाडांनी टीका केली. रोहित पवारांनी वळसे-पाटलांना लक्ष्य केलं. पडसाद उमटल्यानंतर दिलीप वळसे-पाटलांनी खुलासा केला.

दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली दिलगीरी

शरद पवारांबद्दल केलेल्या विधानाबद्दल वळसे-पाटील म्हणाले, “मूळात माझं कालच भाषण काळजीपूर्वक ऐकलं, तर मी कुठेही शरद पवार यांच्यावर टीका केली नाही किंवा चुकीचं बोललो नाही. माझं म्हणणं असं होतं की, एवढा मोठा आमचा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेने ज्या खंबीरपणे उभे राहायला पाहिजे होतं, ते घडलं नाही. त्याबद्दलची खंत माझ्या मनात होती आणि ती मी बोलून दाखवली.”

हे वाचलं का?

वाचा >> Sanjay Raut : राऊत लोकसभा लढवणार, शिवसेनेने (UBT) मतदारसंघही ठरवला!

“असं नाही की, मी हे कालच बोललो. मी पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये किंवा मेळाव्यात जाहीरपणे हे बोललो आहे. शरद पवारांबद्दल माझ्या तोंडून कधीही कुठलाही चुकीचा शब्द किंवा अशी टीका होणं शक्य नाही. तरी सुद्धा हा जो गैरसमज झालेला आहे, त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो.”

वाचा >> Dilip walse Patil : ‘बरे झाले मनातील विष बाहेर पडतेय’, जितेंद्र आव्हाड भडकले

शरद पवार समर्थक नेत्यांकडून टीका करण्यात आली. त्याबद्दल वळसे पाटील म्हणाले, “माध्यमांनी हा विषय ज्या पद्धतीने दाखवला, त्यामधील अर्थ काय हे समजून न घेता. त्याला शरद पवारांवर टीका असं दाखवलं. मी ती खंत व्यक्त करत होतो. शरद पवारांनी 40-50 वर्ष राज्यासाठी आणि देशासाठी काम केलं आहे. अशा नेत्याला हा पाठिंबा मिळाला पाहिजे. मी सांगताना हेही सांगितलं की, देशातील प्रादेशिक पक्षांना त्या-त्या राज्यामध्ये एकतर्फी बहुमत मिळतं, ते महाराष्ट्रात का मिळत नाही, त्याबद्दलची माझी खंत होती”, अशी भूमिका दिलीप वळसे-पाटील यांनी मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT