‘…त्यावेळी गिरीश महाजन हाफ पँटवर फिरायचे’; एकनाथ खडसे का भडकले?
-मनीष जोग, जळगाव Eknath Khadse-Girish Mahajan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका विधानाने महाराष्ट्रात नव्या राजकीय वादाची ठिणगी पडलीये. मोदींच्या विधानानंतर गिरीश महाजनांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्याला एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय. महाजनांना डिवचतानाच खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधलाय. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती तुटली. त्यावेळी भाजपने युती तोडली, असा दावा वारंवार उद्धव ठाकरेंकडून […]
ADVERTISEMENT

-मनीष जोग, जळगाव
Eknath Khadse-Girish Mahajan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका विधानाने महाराष्ट्रात नव्या राजकीय वादाची ठिणगी पडलीये. मोदींच्या विधानानंतर गिरीश महाजनांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्याला एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय. महाजनांना डिवचतानाच खडसेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधलाय.
2014 मध्ये भाजप-शिवसेना युती तुटली. त्यावेळी भाजपने युती तोडली, असा दावा वारंवार उद्धव ठाकरेंकडून केला गेला. याला अमित शाह यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने उत्तरं दिली गेली. पण, पंतप्रधान मोदींनी यावर मौन सोडत ठाकरेंच्या शिवसेनेवर खापर फोडलं. गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरेंच्या आडमुठेपणामुळे युती तुटल्याचे म्हटले.
एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांना चिमटे
पंतप्रधान मोदींपाठोपाठ महाजनांनी केलेल्या विधानावर त्यावेळी भाजपत असलेले आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भूमिका मांडली. महाजनांना उत्तर देताना खडसेंनी डिचवलं. “गिरीश महाजन त्या काळखंडामध्ये अर्ध्या पँटवर फिरत होते. त्यांचा या चर्चेमध्ये कुठेही सहभाग नव्हता. तेव्हा पक्षामध्ये त्यांना कोणत्याही मीटिंगला बोलावलं जात नव्हतं. कोअर कमिटी.. दिल्लीतील वरिष्ठ स्तरावरच्या बैठका होत्या, त्यांना मला आमंत्रित केलं जायचं. किंबहुना महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून पक्षाची सुत्रं देवेंद्रजी आणि मी… दोघांकडे सोपवलेली होती.”