India Alliance : ठाकरेंचा नितीश कुमारांना फोन, म्हणाले, भाई ऐसा कैसा चलेगा…
लोकसभा 2024 निवडणुकांसाठी काहीच दिवस शिल्लक आहेत, तरीही इंडिया आघाडीकडून अजूनही जागावाटपाबाबत कोणताच निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी पुढं येऊन आता इंडिया आघाडीच्या निर्णयासाठी नितीश कुमारांना फोन केला आहे. त्यावर त्यांची चर्चाही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

India Alliance : आगामी काळातील म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) अजून 3 ते 4 महिने बाकी आहेत. मात्र इंडिया आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाबाबत अद्याप एकमत झालेले दिसूत येत नाही. विरोधकांची जी आघाडी करण्यात आली आहे, त्या आघाडीमध्ये सहभागी झालेले राजकीय पक्ष आपापली महत्त्वाकांक्षा बरोबर घेऊनच आले आहेत. त्यामुळेच आघाडीत बिघाडी होत असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या महत्त्वांकाक्षेमुळेच इंडिया आघाडातील जागांबाबत कमी दिवस राहिलेले असतानाही अजून कोणताही निर्णय झाला नाही.
इंडिया आघाडी एकसंध
बिहारच्या राजकारणाचा विचार केला तर बिहारसारख्या राज्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मकर संक्रांतीनंतर येथे राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षांनी एकमेकांची चाचपणी करून ध्येय धोरणं ठरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राजकीय गणितं चालू असतानाच ठाकरे गटाच्या शिवसेनेने मात्र जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली आहे. त्यांची चर्चा झाल्याने इंडिया आघाडी एकसंध ठेवण्याची जबाबदारी आता या दोन नेत्यांवर असल्याचेच सांगण्यात येत आहे.
कोणतीच रॅली नाही
आगामी काळातील निवडणुकांवर सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांनीही जोरदार तयारी केली आहे. इंडिया आघाडीसाठी ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांना फोन लावला त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या दृष्टीने अजून आम्ही काहीच केले नाही. अजून एकही रॅली घेण्यात आली नाही व अजून निमंत्रकही ठरला नसल्याचे सांगत इंडिया आघाडीसाठी ‘भाई ऐसे कैसे चलेगा? असा सवालच त्यांनी केला आहे.
हे ही वाचा >> मॉडेल दिव्याच्या हत्येची ‘ती’ शेवटची रात्र, पोलिसांनी सगळा घटनाक्रमच दाखवला
निवडणुका जाहीर होणार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, तुम्ही तुमच्या राज्यातील तसे सांगितले तरी 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या कार्यक्रमानंतरच आता निवडणुका जाहीर होतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता आमच्याकडे वेळ कुठे आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.










