माजी खासदार जयाप्रदा फरार? अडचणीत वाढ, नेमकं प्रकरण काय?
भाजपच्या माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात न्यायालयानं फरार घोषित करून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. तसेच त्यांना अटक करून तात्काळ न्यायालयात हजर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

माजी खासदार जयाप्रदा फरार

जयाप्रदा फरार, अटक वॉरंटच निघालं
Former mp Jayaprada: माजी खासदार आणि चित्रपट अभिनेत्री जयाप्रदा या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता भंग (code of conduct) केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश न्यायालयाने (UP Court) जयाप्रदा यांना 'फरार' घोषित केले आहे. त्यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची पाच वर्षापूर्वीची जुनी प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत.
अजामीनपात्र वॉरंट
या प्रकरणातील दोन्ही प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान त्या हजर झाल्या नाहीत. तर 7 वेळा अजामीनपात्र वॉरंटही त्यांना बजावण्यात आले आहे. त्यानंतर खासदार-आमदारांच्या विशेष न्यायालयाने जयाप्रदा यांना 'फरार' असल्याचे घोषित केले आहे.
प्रकरण 2019 मधील
माजी खासदार जया प्रदा यांचे हे प्रकरण 2019 मधील आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने जया प्रदा यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्याबरोबर लढत होती.
आचारसंहितेचे उल्लंघन
लोकसभा निवडणुकीचा प्रचार चालू असतानाच जयाप्रदा यांनी आचारसंहितेचे उल्लंघन करत नूरपूर गावात त्यांनी एका रस्त्याचे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला होता. त्यामुळे या प्रकरणी जया प्रदा यांच्या विरोधात स्वार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.