Maharashtra Politics: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे थेट ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंसोबत दीड तास खलबतं!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey met Shiv Sena Thackeray group party chief Uddhav Thackeray
Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey met Shiv Sena Thackeray group party chief Uddhav Thackeray
social share
google news

Sanjay Pande Meet Uddhav Thackeray : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी भेट झाली. ही बैठक जवळपास दीड तास चालली. (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey met Shiv Sena Thackeray group party chief Uddhav Thackeray)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या काळात संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. आता पांडे आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शुक्रवारी (20 ऑक्टोबर) रात्री उशीरा झालेल्या भेटीत संजय पांडे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप समजलेलं नाही.

वाचा: Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियांनी जोडीदारांसोबतचे नाते तोडले, कारण…

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कडून कर्मचार्‍यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंगशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर महिन्यात जामीन मंजूर केला आहे. ईडीने जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जे 8 मे 2023 रोजी फेटाळण्यात आले.

हे वाचलं का?

ED ने पांडे यांना 19 जुलै 2022 रोजी, संजय पांडेंच्या निवृत्तीनंतर काही दिवसांनी अटक केली होती आणि 24 सप्टेंबर रोजी, CBI ने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचारी प्रकरणात कथित बेकायदेशीर फोन टॅप प्रकरणी देखील अटक केली होती.

वाचा: Sharad Pawar नी PM मोदींचे मानले आभार! गडकरी, गोयल, फडणवीसांचे टोचले कान

संजय पांडेंना अटक करण्यात आलेलं फोन टॅपिंग प्रकरण आहे तरी काय?

संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती. मुंबईस्थित नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी तपासानंतर सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त IPS संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि इतर अनेक आरोपींच्या नावांचा समावेश होता.

ADVERTISEMENT

संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता. याचप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

वाचा: Lalit Patil : 300 कोटींचे ड्रग्ज, दोन महिला; ललित पाटीलची Inside Story

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातील मुख्य आरोपींपैकी एमएस आयएसईसी सर्व्हिसेस प्रा. Ltd. (M/s. ISEC Services Pvt Ltd), ISEC तत्कालीन संचालक IPS संजय पांडे, ISEC तत्कालीन वरिष्ठ माहिती सुरक्षा विश्लेषक नमन चतुर्वेदी NSE अधिकारी जगदीश तुकाराम, रवी वाराणसी तत्कालीन कार्यकारी उपाध्यक्ष, रवी नारायण व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापकीय संचालक यांची नावे चित्रा रामकृष्ण (सु. चित्रा रामकृष्ण डीएमडी/व्यवस्थापकीय संचालक) यांच्या नावाचा समावेश होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT