ठाकरेंच्या हस्ते पुतळ्याच अनावरण, सभेतही आठवणीने भावूक… कोण होते आर. ओ. पाटील?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Former Shiv Sena MLA R. O. Patil's statue was unveiled by party chief Uddhav Thackeray at Pachora
Former Shiv Sena MLA R. O. Patil's statue was unveiled by party chief Uddhav Thackeray at Pachora
social share
google news

पाचोरा : आज खरच आर.ओ. तात्यांची उणीव भासते, 40 गद्दार गेले तरी फरक पडत नाही पण एक निष्ठावंत आणि विश्वासू गेला की खड्डा पडतो, आज त्यांची उणीव जाणवते. तात्यांच्या पुतळ्याचे अनावरण करावे लागेल असे वाटले नाही. आता त्यांचा वारसा वैशाली ताई पुढे चालवत आहेत. शेतकऱ्यांसाठी झटणारे हे घराणे होते. घराण्याला परंपरा होती, असं म्हणतं शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या आठवणीत भावूक झाले. (Former Shiv Sena MLA R. O. Patil’s statue was unveiled by party chief Uddhav Thackeray at Pachora)

ADVERTISEMENT

कोण होते आर. ओ. पाटील?

रघुनाथ ओंकार पाटील अर्थात आर. ओ. तात्या म्हणून जळगाव जिल्ह्यात परिचीत आहेत. पाचोरा तालुक्यातील शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून आर.ओ. तात्या ओळखले जातात. तात्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1950 रोजी पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बु. येथे शेतकरी कुटुंबात झाला. बी. एस्सी अॅग्रीची पदवी मिळविणारे तात्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे शास्त्रशुद्ध अभ्यास करणारे आणि त्यावर लढणारे नेते होते. शेतीशी नाळ जुळल्याने पाचोऱ्यात त्यांनी आदर्श कृषी सेवा केंद्र आणि गंगा अॅग्रो नावाची कंपनी सुरू केली होती. पुढे 2 मार्च 1988 रोजी निर्मल सिड्स नावाची बीज उत्पादक कंपनी सुरू केली.

दोन वेळा आमदारकीचा मान :

1999 मध्ये राजकारणात प्रवेश करून आर. ओ. पाटील शिवसेनेचे तालुक्यातील पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 2 वेळा निवडून येत त्यांनी मतदारसंघाला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवला. आर.ओ. पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी तत्कालिन जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शब्द दिला होता. 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रचाराचा नारळ फुटून सभाही होणार होती. मात्र, त्यापूर्वीच आर. ओ. पाटील यांचे कर्करोगाने निधन झाले.

हे वाचलं का?

आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण :

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसंच जैवी प्रयोगशाळेचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना वैशाली पाटील म्हणाल्या, तात्यांनी भव्य प्रयोगशाळा उभी केली. या प्रयोगशाळेचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते व्हावं, अशी त्यांची मनस्वी इच्छा होती. पण त्यांच्या निधनानंतर स्वप्न अधुरं राहीलं होतं. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. त्यांची इच्छा पूर्ण झाली. तसंच आज उद्धव ठाकरे यांनी तात्यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. उद्धव ठाकरेंवर प्रेम करणारे तात्या आज प्रत्यक्ष बोलत होते असं वाटत होतं. जशी दोघांची भेट व्हायची तशी उद्धव साहेब आणि त्यांची भेट झाली, असे भावनिक मतही त्यांनी व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT