Nagpur Violence Mastermind: नागपूर हिंसाचार घडवणाऱ्या 'नेत्याला' निवडणुकीत मिळालेली 'एवढी' मतं
Mastermind of Nagpur violence: नागपूर हिंसाचाराचा प्रमुख मास्टरमाईंडला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हा कोणी सामान्य माणूस नसून एक राजकीय नेता आहे. ज्याने थेट नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढवली होती.
ADVERTISEMENT

Who is Mastermind of Nagpur violence: नागपूर: नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड नेमका कोण हे आता समोर आलं आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, मुख्य आरोपी, 38 वर्षीय फहीम शमीम खान हाच हिंसाचार भडकवण्यास जबाबदार आहे. शमीम हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) चा नागपूर शहर अध्यक्ष आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फहीम खान याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पोलीस तपासात असेही समोर आले की, फहीमने प्रक्षोभक भाषणे देऊन समाजातील लोकांना भडकावले होते, त्यानंतर नागपुरात हिंसाचार उसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, फहीम शमीम खान हा नागपूरच्या संजय बाग कॉलनी यशोधरा नगरचा रहिवासी आहे. त्याचे नाव यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये समोर आले होते. त्याने 2024 ची लोकसभा निवडणूक नागपूर मतदारसंघातून मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) च्या तिकिटावर लढवली होती, ज्यामध्ये त्याला दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर, तो राजकीयदृष्ट्या सक्रिय झाला आणि शहरात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता.
हे ही वाचा>> Nagpur Violence Mastermind: निवडणूक लढवणारा 'हा' नेताच निघाला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, फोटोही आला समोर..
नागपूर हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. फहीम खानने काही कट्टरपंथी लोकांना एकत्र केले आणि नियोजनबद्ध पद्धतीने दंगली घडवण्याचे काम केले. चौकशी अहवालानुसार, हिंसाचाराच्या एक दिवस आधी, एमडीपी नेते गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर जमले होते आणि त्यांनी 'औरंगजेब झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. यावेळी फहीम खानही तिथे उपस्थित होता. जमावाला भडकवण्यात त्यानेच मुख्य भूमिका बजावली असा पोलिसांचा आरोप आहे.
सोमवारी रात्री मध्य नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरात हिंसाचार झाला. दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली, ज्यामध्ये 34 पोलीस जखमी झाले. एका समुदायाचे धार्मिक पुस्तक जाळल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या, त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागात संचारबंदी लागू केली.










