‘राष्ट्रवादीने सेक्युलरिझमला फाटा दिला’, अजित पवारांचं मोठं विधान… मनात नेमकं काय?

साहिल जोशी

ADVERTISEMENT

govt with shiv sena means ncp torn apart secularism is it ajit pawar ready to go with bjp again
govt with shiv sena means ncp torn apart secularism is it ajit pawar ready to go with bjp again
social share
google news

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपच्या (BJP) सोबत जाणार का या चर्चेला सातत्याने उधाण आलं आहे. असं असताना आता अजित पवारांनी एक अत्यंत मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राजकीय भूमिकेबाबत गूढ निर्माण झालं आहे. आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी एक असं वक्तव्य केलं आहे की, ज्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ माजली आहे. (govt with shiv sena means ncp torn apart secularism is it ajit pawar ready to go with bjp again)

ADVERTISEMENT

पुण्यात सकाळ वृत्तसमूहाच्या एका विशेष कार्यक्रमात अजित पवार यांची आज (21 एप्रिल) जाहीर मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं की, ‘2019 ला सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सेक्युलरिझमला फाटा दिला.’ आता त्यांच्या याच वाक्याचा अर्थ असाही लावला जात आहे की, अजित पवार हे भाजपसोबत जाण्यासाठी विशिष्ठ पार्श्वभूमी तर तयार करत नाही ना?

अजित पवार नेमकं काय म्हणाले:

सकाळ वृत्तसमूहाच्या कार्यक्रमात अजित पवार यांना भाजपसोबत जाण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला त्याला अजित पवारांनी नेमकं काय उत्तर दिलं हे आपण आधी जाणून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> “आता देवेंद्र फडणवीसांचा गळा धरू का?”, अजित पवारांचं उत्तर ऐकून…

प्रश्न: राष्ट्रवादीत असा कुठला दबाव गट आहे का, की भाजपसोबत गेलो तर स्थिर सरकार स्थापन करू शकू?

अजित पवार: अजिबात असा कुठला दबाव नाही, शेवटी एकंदरीतच काम करत असताना तुम्ही पाहिलं तर, आपण ह्याआधी सेक्युलर, पुरोगामी अशा सगळ्या गोष्टी बोलत आलो. नंतर 2019 ला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिघांनी सरकार केलं, त्यावेळेस या सगळ्याला फाटा देण्यात आला. कारण सेनेनं कायमच हिंदुत्वाचाच पुरस्कार केलेला आहे.

ADVERTISEMENT

आजही हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीनेच बोललं जातं. त्यांनी त्याच भूमिकेतून कुणाला काहीही वाटो, त्यांनी शेवटपर्यंत काम केलं. त्याच रस्त्याने उद्धवजी पुढे गेलं. पण नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काही बाबतीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळी मतं असली, तरी ज्यातून मतभेद होतील, अशा पद्धतीची मतं पुढे आणायची नाही. बाकीच्या बाबतीत सरकार चालवायचं असं काम केलं. असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या मनात नेमकं काय?

दरम्यान, अजित पवार यांच्या याच उत्तरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार 40 आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा गेल्या दोन दिवसांपूर्वी सुरू होती. मात्र, आपल्याबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचं म्हणत अजित पवार यांनी त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी अशा प्रकारचं विधान केलं आहे की, त्यामुळे भविष्यात अजित पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात या शंकेला वाव मिळाला आहे.

हे ही वाचा>> 14 श्री सदस्य मृत्यू: ‘तो अधिकारी स्वच्छ आणि प्रामाणिक, पण बॉससमोर…’ पवार असं का म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसने जर शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली तर भविष्यात राष्ट्रवादी भाजपसोबत देखील सत्ता स्थापन करु शकतं असाच अजित पवारांच्या वक्तव्याचा अर्थ राजकीय वर्तुळात काढला जात आहे.

2019 च्या निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा जो शपथविधी झाला त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील जवळीक उघड झाली होती. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार हे भाजपसोबत युती देखील करू शकतात हेही स्पष्ट झालं होतं.

अशात आता राज्यात ज्या पद्धतीने सत्तांतर झालेलं आहे आणि त्यात शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना आपलं सरकार स्थिर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या साथीने काही नवी खेळीही खेळू शकतात. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी पाहता अजित पवार यांचं आजचं विधान हे फार महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT