मुंबईलाही लाजवेल असा ठाण्याचा रक्तरंजित राजकीय गुन्हेगारीचा इतिहास!

मुंबई तक

Thane Political Crime History: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर ठाणे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जाणून घ्या याचविषयी सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

Thane crime Politics
ठाण्यातील राजकीय गुन्हेगारीचा इतिहास
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली

point

राजकीय गुन्हेगारी आणि ठाणे जिल्हा

point

ठाणे जिल्ह्यात राजकीय गुन्हेगारीला कोण घालतंय खतपाणी?

Thane Political Crime: ठाणे: पुण्यातील मुळशी पॅटर्न, नाशिक, संभाजीनगर किंवा नागपुरातील टोळीयुद्धाच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. दाऊद इब्राहिम, मन्या सुर्वे, छोटा राजन, हाजी मस्तान, सुलतान मिर्झा किंवा छोटा शकील. अशा अनेक गुंडांच्या रक्तरंजित कहाण्या आणि भाईगिरीच्या बातम्या ऐकत एक पिढी मोठी झाली आहे. जमीन, संपत्ती, पैसा, शराब किंवा शबाबच्या मोहातून गुन्हेगारांनी अनेकांच्या सर्रासपणे हत्या करण्यात केल्या आहेत. शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे निर्घृण आणि निर्दयीपणे हत्यांच सत्रं. (history of bloody political crime in thane district is worse than mumbai ganpat gaikwad firing case)

हत्यांसाठी गुंड कुप्रसिद्धच, परंतु आता माणसं संपवण्याच्या बाबतीत राजकारणीही काही मागे राहिलेले नाहीत. मुंबईच्या उपनगरांमध्ये काही गुंडांनी कोट्यवधींच्या सुपाऱ्या घेत 'व्हाईट कॉलर' नेत्यांचा गेम केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. परंतु राजकीय शर्यतीत पदांसाठी, वर्चस्वासाठी हत्याकांडांच्या घटनांचा एक मोठा इतिहास महाराष्ट्राला राहिलेला आहे. कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेने मुंबईच्या उपनगरांमधील राजकीय गुन्हेगारीचा नवा पॅटर्न अधोरेखित झाला आहे. कधी-काळी सांस्कृतिक ऐश्वर्यासाठी प्रसिद्ध असणारा मराठमोळा ठाणे जिल्हा हा 'गँगस्टर, भाईलोक आणि गुंडांचं ठाणं' कसं झालं?, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात राजकीय कारणांमुळं कुणा-कुणाच्या हत्या झाल्या? याबाबत सविस्तर आणि तपशीलवार समजून घेऊया. 

ठाणे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिवसेनेच्या दोन नेत्यांवर पोलीस ठाण्यातच तुफान गोळीबार केला. प्रामुख्याने जमिनीच्या आणि काहीअंशी राजकीय वैरातून ही घटना घडली असून सुदैवाने दोन्ही नेत्यांचा जीव वाचला आहे. घटनेच्या काही तासांतच मुख्यमंत्री शिंदेंनी जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाड यांना अटकही केली. परंतु आरोपीने थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत प्रकरणाला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला. गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळं मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गायकवाड प्रकरण ताजं असलं तरी ते नवं नाही. यापूर्वी कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापुरात मोठं हत्यांचं सत्र महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp