समजून घ्या: फडणवीसांनी खडसावलं ते मंत्र्यांचे PA आणि OSD ठरतात कसे, नेमकं काय करतात काम?
देवेंद्र फडणवीसांनी यांनी मंत्र्यांचे PA आणि OSD ठरविण्यावरून अनेक मंत्र्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. आता हे अधिकारी नेमकं काम काय करतात आणि त्यांची नेमणूक कशी होते हे आपण सविस्तर जाणून घेऊया?
ADVERTISEMENT

मुंबई: जी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती ती मंत्री माणिकराव कोकाटेंनी जाहीरपणे बोलून दाखवल्याने मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिस्तीवर मंत्री काही खूष नसल्याचं स्पष्ट दिसून आलं. आता आमचे पीए आणि osd ठरवणंही आमच्या हातात नाही राहिलं, ते ही CM ठरवतायत, असं म्हणालेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे. शिवसेना मंत्र्यांचीही हीच तक्रार असल्याची खुसपूस सुरू होती. पण मंत्र्यांना आपल्याच मर्जीतले PA आणि OSD का हवे? कोण ठरवतं PA आणि OSD? मुळात PA आणि OSD असतात कोण? हे आपण सविस्तर समजून घेऊया.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले 5 डिसेंबर, 2024 ला. त्यानंतर दोन-अडीच महिने उलटून गेले तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्र्यांनी पाठवलेल्या PA आणि OSD च्या नावांच्या शिफारसीची फाईल काही मंजूर होईना. दोन अडीच महिने दाखवलेल्या संयमाचा बांध शेवटी फुटला आणि नेते कधी कुजबुजत तर कधी थेट बोलू लागले.
सरतेशेवटी मुख्यमंत्री कार्यालयाकडून 109 नावांना मंजुरी मिळाली. एकूण 125 जणांची नावं PA आणि OSD साठी पाठवण्यात आलेली, त्यापैकी 109 जण मंजूर झाले. सुमार कामगिरी, सुरू असलेल्या चौकशा, किंवा फिक्सर म्हणून असलेला शिक्का या कारणांस्तव 16 जणांची नावं मंजूर झालेली नाहीत. यावरच्या राजकीय मुद्द्यावर आपण नंतर बोलू पण मूळ मुद्दा हे PA आणि OSD असतात कोण?
PA आणि OSD असतात तरी कोण?
2-3 प्रकार असतात जे अधिकारी पातळीवर नेत्यांच्या अवतीभोवती तुम्हाला पाहायला मिळतात, किंवा त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टमधले असतात ते म्हणजे PA, PS आणि OSD.