Karnataka Results 2023 : भाजपचं टेन्शन वाढलं! 2024 मध्ये असा होणार परिणाम?
दक्षिणेकडील एक महत्त्वाचं राज्य भाजपच्या हातून निसटलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. या निवडणूक निकालामुळे भाजपसाठी लोकसभा निवडणुकीत अडचणी वाढू शकतात. या निवडणुकीचा कसा होणार परिणाम?
ADVERTISEMENT

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेस पुन्हा सत्तेत परतली आहे. तर विधानसभा निवडणुकीतील या पराभवामुळे भाजपची भविष्यातील चिंता वाढली आहे. कर्नाटकातील एकूण 224 जागांपैकी काँग्रेस 136 जागा काँग्रेस जिंकताना दिसत आहे, तर भाजपची 64 जागांपर्यंत घसरण झाली आहे.या निवडणुकीचे राजकीय महत्त्व केवळ कर्नाटकच्या राजकारणापुरते मर्यादित नसून, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही हे महत्त्वाचे मानले जात आहे. अशा स्थितीत कर्नाटकच्या पराभवाने भाजपच्या मिशन-2024 साठीचा ताण वाढला आहे का? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याच दृष्टिकोनातूनही कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची मानली जात होती. पण, आता भाजपला कर्नाटकात सत्तेतून बाहेर व्हावं लागलं आहे, इतकंच नाही तर जागाही घटल्या आहेत. त्यामुळे भाजपला लोकसभेतील आपले लक्ष्य गाठणे अवघडच नाही तर अशक्यही होऊ शकते. कर्नाटक निवडणूक ही 2024 ची उपांत्य फेरी मानली जात होती. अशा स्थितीत पक्षाच्या पराभवामुळे भविष्याची चिंता वाढली आहे.
कर्नाटकात जागा कमी होऊ शकतात
भाजपचा निवडणूक पराभव 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात पक्षाच्या जागा कमी करू शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 28 जागांपैकी भाजपने 25 जागा जिंकल्या आणि त्यांच्या समर्थित अपक्ष उमेदवारांनी एक जागा जिंकली तर काँग्रेस-जेडीएसला प्रत्येकी एक जागा मिळाली. अशा स्थितीत 2019 च्या निकालाची पुनरावृत्ती कर्नाटकात भाजपच्या पराभवाने होणे कठीण होऊ शकते आणि काँग्रेसच्या जागा वाढू शकतात. 2024 मध्ये कर्नाटकात भाजपला कमी जागा मिळू शकतात.
हेही वाचा >> Karnataka: ‘फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे..’, शिंदेंचं नाव घेत पवारांनी भाजपला डिवचलं!
पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातूनही भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. या राज्यांतील जागांचा तोटा भरून काढण्यासाठी भाजपला नवीन राज्ये शोधावी लागतील, जे संधी सध्या दिसत नाही.