Ajit Pawar: ‘मी 10 वीला नापास झालेलो..’, अर्थमंत्री अजितदादांचं नेमंक शिक्षण किती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

In a special interview given by the Finance Minister of the state, Ajit Pawar told a very interesting story about his education. Read what exactly Ajit Pawar said.
In a special interview given by the Finance Minister of the state, Ajit Pawar told a very interesting story about his education. Read what exactly Ajit Pawar said.
social share
google news

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत. गेल्या तीन दशकापासून जवळजवळ कायम सत्तेत असणाऱ्या अजित पवारांनी आपल्या राजकीय निर्णयांनी कायमच सर्वांना अचंबित केलं आहे. सध्या ते अर्थमंत्री म्हणून राज्याचा गाडा हाकत आहे. पण याच अजित पवारांचं नेमकं शिक्षण (Education) किती याविषयी त्यांनी नेमका किस्सा सांगितला आहे. (i failed in class 10th special interview finance minister dcm ajit pawar told a very interesting story about education news marathi latest)

ADVERTISEMENT

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी त्यांचे राजकारणापलीकडचे प्रचंड इंटरेस्टिंग असे किस्सेही सांगितले आहेत. त्याचपैकी त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा किस्साही सांगितला. वाचा हा इंटरेस्टिंग किस्सा जशाचा तसा:

‘दहावीला मी नापास झालो, एक विषय राहिला होता…’

‘बारामतीला आमच्या सगळ्या भावा-बहिणींचं शिक्षण हे बालविकास मंदिरमध्ये झालं. आमच्या मोठ्या काकी या आमच्या सगळ्यांचं शिक्षण आणि इतर गोष्टी पाहायच्या. आमच्या सगळ्यांचं हायस्कूलचं शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये झालं. पार पवार साहेबांचं शिक्षण आणि आमचं शिक्षण याच हायस्कूलमध्ये झालं. कारण ती शाळा 1911 साली स्थापन झाली होती.’

हे वाचलं का?

हे ही वाचा >> NCP: ‘आमदारांना भेटायचं असेल तर भेटू दे, पण मी..’, शरद पवारांचं मोठं विधान

‘शिक्षण हे बारामतीत झालं.. दहावीला मी मुंबईला आलो विल्सन हायस्कूलला गिरगावमध्ये माझं अॅडमिशन घेतलं. पण दुर्दैवाने दहावीमध्ये मी नापास झालो. एक विषय माझा राहिला.’

‘त्यावेळी साहेब इथे होते.. सुप्रिया इथे होती, नंतर काका-काकी म्हणाले आम्ही अजितला घेऊन जातो. त्यांनी आणलं.. मला माहित नाही. पण मला सांगितलं की, तुला तिकडे मुंबईला जायचं आहे. आलो.. परंतु मला मुंबई त्यावेळी काही मानवली नाही. माझं ते अपयश झालं.. एक विषय राहिल्यामुळे मला जावं लागलं. मग नंतर पुढच्या वर्षी तो विषय मी दिला. विषय दिल्यानंतर माझं मन काही लागेना.. कारण माझ्या बरोबरची बॅच पुढे निघून गेली. मग काय करायचं तर.. कोल्हापूरला शहाजी कॉलेजला प्रवेश घेतला.’ अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.

ADVERTISEMENT

..म्हणून मोठ्या बहिणीच्या डोक्याला डोकं लावायचो!

‘आमच्या घरात आमची मोठी बहीण ऋजू अक्का ही सगळ्यात मोठी होती. ती सगळ्यात हुशार होती. ती डॉक्टर झाली. सगळ्यात थोरले काका वसंतराव पवारांची मुलगी. त्या डॉक्टर आहेत. माझी मोठी बहीण विजया पाटील या सकाळच्या व्यवस्थापक. ती अतिशय हुशार.. आम्ही चार भावंडं त्यात सगळ्यात हुशार ती.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> अजित पवार उपमुख्यमंत्री होताच 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या? तुमचे नवे जिल्हाधिकारी कोण?

‘आम्ही कधी-कधी लहानपण झोपल्यानंतर तिला न कळता तिच्या डोक्याला डोकं लावायचो. तर मला नीता माझी धाकटी बहीण किंवा श्रीनिवास मला म्हणायचे की, कशाला दादा ते असं.. जरा तिची बुद्धी आपल्या डोक्यात येऊ दे.. डोक्याला डोकं लागलं तर काय तरी येईल.. इथपर्यंतचा फालतूपणा करणारे आम्ही..’

‘आम्ही अभ्यासात फार हुशार नव्हतो. नीता, श्रीनिवास पण तसेच.. सुप्रिया त्यातला त्यात बरी.. सुप्रिया, नीता आणि श्रीनिवास यांचा कधी गॅप नाही पडला. मी गॅप घेतला..’ असाही इंटरेस्टिंग किस्सा अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

‘मी फॉर्म भरताना 12वी पास एवढंच लिहतो, कारण..’

‘मी बी.कॉमचं शिक्षण घेतलं.. पण मी बी. कॉम झालो नाही. माझी एक सेमिस्टर राहिली. एक सेमिस्टर राहिल्यानंतर बी.कॉम लिहिता येत नाही. मग आपल्याला 12वीच शिक्षण लिहावं लागतं. त्यामुळे माझा फॉर्म भरताना मी बी.कॉम किंवा पदवीधर कधीच लावत नाही.’ असं म्हणत अजित पवारांनी आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT