'मी थोडा अस्वस्थ होतो कारण...' शरद पवारांचं मोठं विधान, पण...
राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा असताना शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार आणि खासदार हे अजित दादांच्या राष्ट्रवादीमध्ये आपला पक्ष विलीन करण्याची मागणी करत असल्याची जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशावेळी शरद पवार यांनी आता त्यांची नेमकी भूमिका काय असणार हे स्पष्ट केलं आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बैठक पार पडली. ज्यामध्ये शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचं पुढील राजकारण कसं असेल हेच पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
'मी थोडा अस्वस्थ होतो कारण सहकारी लोकांची अपेक्षा काय आहे? विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय सुरू असेल असा प्रश्न होता मात्र कालपासून विद्यार्थी महिलां युवक यांच्या बैठका पार पडल्या आणि त्यानंतर माझा विश्वास वाढला.' असं म्हणत शरद पवारांनी आपला पक्ष विलीन होणार नसल्याचं एक प्रकारे म्हटलं होतं.
शरद पवारांचं भाषण जसच्या तसं...
मी थोडा अस्वस्थ होतो कारण सहकारी लोकांची अपेक्षा काय आहे? विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय सुरू असेल असा प्रश्न होता माञ कालपासून विद्यार्थी महिलां युवक यांच्या बैठका पार पडल्या आणि त्यानंतर माझा विश्वास वाढला. निवडणुकीत अपयश आलं आहे तरी खचून गेले आहेत असं चित्रं दिसलं नाही. मी विचार करतं होतो की मागील ६० वर्ष नेहरू गांधी विचारांची काय परिस्थीत होती? एक वर्ष असं होतं की काँग्रेस पक्ष राज्यात साफ झाला होता. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे एखादी दुसरी जागा निवडून आली होती.
धुळे, नाशिक, जळगाव येथे 100 टक्के पराभव झाला होता. 1957 ची परिस्थीत होती. मात्र त्यानंतर 1972 साली परिस्थीत बदलली आणि जी निवडणूक झाली 288 पैकी 230 जागा काँग्रेसला मिळाल्या. 1980 साली निवडणुका झाल्या माझ्या नेतृत्वाखाली 58 ते 59 लोकं निवडून आल्या. मी काही कारणासाठी इंग्लंडल गेलो, माघारी आलो त्यावेळी केवळ 6 राहिले.. बाकी निघून गेले मी त्यावेळीं पुनः संघटना बांधली आणि त्यानंतर 72 जागा निवडून आल्या. परिस्थीत बदलत असते त्यामुळे मागे हाटायचं नसतं.










