MP Election 2023 : शिवराज सिंह चौहान नाही, तर कोण होणार मुख्यमंत्री? 5 नावे स्पर्धेत
MP New Chief Minister : मध्य प्रदेशात भाजपला पाशवी बहुमत मिळालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान होणार की नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार? कोणते चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कुणाची नावे आहेत? जाणून घ्या…
ADVERTISEMENT

MP Next CM : भाजपने मध्य प्रदेशात पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे आता मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न जटील बनला आहे कारण शिवराज सिंह चौहान यांनी या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या महिला कल्याणकारी धोरणांना लोकप्रियता मिळाली, त्यामुळे पक्ष त्यांना बाजूला कसे करणार? असे म्हटले जात आहे.
कर्नाटकात बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवून हात पोळवून घेणाऱ्या भाजपने राज्यात बंडखोरी उफाळून येऊ नये म्हणून शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले नाही. पण, इथे उलटे झाल्याचे दिसले. मतदार, विशेषत: महिला शिवराज चौहान यांच्या योजनांनी एवढ्या प्रभावित झाल्या की त्यांनी भाजपला भरभरून मतदान केले.
आता ज्या पक्षाने मुख्यमंत्री चेहरा बनवले नाही, तो पक्ष पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदासाठी शिवराज सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणार का? मग शिवराज नाही तर मुख्यमंत्रिपदाचा दावेदार कोण? शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाले नाहीत, तर सर्वात वर नाव कोणाचे? यात पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, व्हीडी शर्मा आदींची नावे घेतली जात आहेत. मुख्यमंत्री होण्याची सर्वाधिक शक्यता कोणाची आहे ते पाहू… मात्र अलीकडच्या काळात भाजपमध्ये अशी परंपरा निर्माण झाली आहे की, पक्ष शेवटच्या क्षणी राजकीय धक्का देते. तरीही, काही नावे त्यांच्या प्लस आणि मायनस गुणांसह पाहू.
निकालाने शिवराज सिंह चौहानांची दावेदारी प्रबळ
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकप्रियता लक्षात घेता पक्ष त्यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवेल, असे सध्या तरी वाटत नाही. मात्र केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे संबंध बिघडले, तर त्यांची पाचवी टर्म त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.