Exclusive: 'माझा एन्काउंटरवर विश्वास नाही, पण...', अक्षय शिंदे चकमकीवर फडणवीसांचं मोठं विधान

साहिल जोशी

Devendra Fadnavis on Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये बोलताना चकमकीबाबत एक मोठं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

अक्षय शिंदे चकमकीवर फडणवीसांचं मोठं विधान
अक्षय शिंदे चकमकीवर फडणवीसांचं मोठं विधान
social share
google news

बातम्या हायलाइट

point

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीसांचं अक्षय शिंदे चकमकीबाबत मोठं विधान

point

पाहा देवेंद्र फडणवीस बदलापूर घटनेवर काय म्हणाले

point

देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांच्या कृतीचं केलं समर्थन

Devendra Fadnavis: मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या चकमकप्रकरणी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये बोलताना एक मोठं विधान केलं आहे. अक्षय शिंदे या चकमकीबाबत अनेकांनी सरकारचं कौतुक केलं आहे. मात्र, असं असलं तरीही याबाबत देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. (india today conclave mumbai i dont believe in the encounter home minister devendra fadnavis big statement on akshay shinde encounter)

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीस बदलापूर चकमकीबाबत नेमकं काय म्हणाले?

1. प्रश्न: अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी कोर्टात जी सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाने तुमच्या सरकारला खडे बोल सुनावले आहेत. याशिवाय अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. काही लोकं या एन्काउंटरने खुश आहेत. पण अनेक जण असेही आहेत की ज्यांना अशा पद्धतीने झालेलं एन्काउंटर आवडलेलं नाही. तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे. 

देवेंद्र फडणवीस: पहिली गोष्ट ही आहे की, माझा एन्काउंटरवर विश्वास नाही. एन्काउंटरवर आम्ही विश्वास ठेवतच नाही. माझं असं म्हणणं आहे की, कोणत्या न्यायप्रक्रियेत कायदा पाळला गेलाच पाहिजे. त्यानुसारच जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे.. हो ती शिक्षा वेळेत मिळाली पाहिजे.

हे ही वाचा>> India Today Conclave: ' NCP ला सोबत घेणं आमच्या मतदारांना अजिबात आवडलं नाही', फडणवीस हे काय बोलून गेले

या केसच्या चौकशीमध्ये येईल की, बंदूक का काढली.. बंदूक हातात कशी गेली हे सगळं चौकशीत येईलच. पण जर एखादा गुन्हेगार बंदूक खेचून आमच्या पोलिसांवर गोळ्या झाडतोय तर आमचे पोलीस काय टाळ्या वाजवत बसणार नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp