उद्धव ठाकरेंना भाजप पुन्हा एंट्री देणार? अमित शाहांनी विषय केला क्लिअर

मुंबई तक

ADVERTISEMENT

is Shiv Sena UBT And BJP alliance is possible in future? what said amit shah Bihar
is Shiv Sena UBT And BJP alliance is possible in future? what said amit shah Bihar
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे-फडणवीसांची विधान भवनाच्या दारातच भेट झाली. ही भेट म्हणजे योगायोग की घडवून आणलेला योग, अशा चर्चा सुरू झाल्या. यातून उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा हातमिळवणी करणार का, शिंदेंना सोबत घेऊनही मतांची गोळीबेरीज जमत नसल्याने भाजप नव्या जुळवाजुळवीच्या तयारीत आहे, अशा चर्चांना उधाण आलं. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शाहांचं विधान समोर आलंय. अमित शाह नितीश कुमारांबद्दल बोलताना ठाकरेंसाठी काय मेसेज दिला आणि त्याचा अर्थ काय हेच आपण जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात भाजपच्या ऑपरेशन लोटसने उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. आणि भाजप-शिंदेंचं सरकार आलं. त्याचवेळी तिकडे बिहारमध्ये भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडत आरजेडी, काँग्रेससोबत हातमिळवणी करत नवं सरकार बनवलं. त्याच बिहारच्या नवादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची जाहीर सभा झाली. सुरवातीलाच भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाह नेमकं काय म्हणाले ते बघुयात.

अमित शाह बिहारमध्ये नेमके काय म्हणाले?

अमित शाह म्हणाले, “मित्रपक्षांचे आमदार दररोज नितीश बाबूंचा विरोध करत आहेत. तेही जनतेच्या विरोधाचा सामना करत आहेत. त्यांचे निम्मे खासदार भाजपचे दरवाजे ठोठावत आहेत. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, कुणाच्याही मनात अशी शंका असेल की, निवडणुकीनंतर नितीश बाबूंना भाजप पुन्हा एनडीएमध्ये घेईल. मी बिहारच्या जनतेला स्पष्ट सांगू इच्छितो आणि लल्लन बाबूंनाही स्पष्ट सांगू इच्छितो की, तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.”

हे वाचलं का?

हेही वाचा – अमित शाह, तुम्ही संगमा, मिंध्येचं काय चाटताय? उद्धव ठाकरेंचा खडा सवाल

“जनतेलाही हेच हवंय की नितीश बाबूंना पुन्हा सोबत घेऊ नये. असंच होईल. जातीवादाचे विष घुसळवणारे नितीश बाबू आणि जंगलराजचे प्रणेते लालू प्रसाद यादव, या दोघांसोबत भाजप कधीही राजकीय संबंध ठेवणार नाही”, असं विधान शाह यांनी केले.

ADVERTISEMENT

अमित शाहांनी आता कोणत्याही परिस्थितीत नितीश कुमार यांच्याशी हातमिळवणी करणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच नितीशकुमारांचे अत्यंत जवळचे सहकारी लल्लन सिंह यांनाही सोबत घेणार नाही, हेही सांगितलं. शाहांनी याबद्दलची घोषणा करताच भाजप कार्यकर्त्यांनी सभा अगदी डोक्यावर घेतली. नितीश कुमारांबद्दलची भाजप कार्यकर्त्यांच्या मनातली कटुता, नाराजीच यातून समोर आली.

ADVERTISEMENT

हे पहा – Uddhav Thackeray यांना महाविकास आघडी च्या ‘वज्रमूठ’ सभेत खास ‘मान’

आता आपण थोडं टायमिंगबद्दल बोलं. बिहारच्या राजकारणात गेल्या महिनाभरापासून पुन्हा एकदा नितीश कुमार हे भाजपसोबत मैत्रीच्या चर्चा करत असल्याच्या बातम्या येत आहेत. तसंच पक्षफुटीच्या भीतीने नितीश कुमार नवी जुळवाजुळव करत असल्याचंही म्हटलं गेलं. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठा संभ्रम निर्माण झालाय. तोच संभ्रम शाहांनी क्लिअर केला.

आता शाहांच्या या विधानाचं महाराष्ट्र कनेक्शन काय त्याबद्दल…

बिहारमध्ये जसा संभ्रम आहे, तिच गोष्ट महाराष्ट्रातही कमीजास्त प्रमाणात निर्माण झालीय. ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनं भाजपसोबतच्या नव्या इनिंगची चर्चा होतेय. पण बिहारमध्ये नितीश कुमारांबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जशी कटुता आहे, तशीच महाराष्ट्रात ठाकरेंबद्दलही आले. शाहांनी अप्रत्यक्षपणे नितीशकुमारांसोबतच्या आमदार, खासदारांना दारं खुली असल्याचं सांगितलं. याचाच अर्थ ठाकरे आणि ठाकरेंचं विश्वासू संजय राऊत वगळले तर त्यांच्या आमदार, खासदारांना भाजपची दारं उघडी आहेत, असा काढला जातोय. असं असलं तरी ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का? याचं उत्तर आगामी काळच देईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT