Uddhav Thackeray: ‘…आता तुम्ही मशालीची धग अनुभवा’, ठाकरेंनी भाजपला सुनावलं

मुंबई तक

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी आजच्या जळगावच्या सभेतून केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्व, फोडाफोडीचे राजकारणावरूनही त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ADVERTISEMENT

Uddhav thsckeray shivsena bjp jalgaon meeting
Uddhav thsckeray shivsena bjp jalgaon meeting
social share
google news

Uddhav Thackeray: मुंबईतील इंडियाच्या बैठकीवर भाजपने निशाणा साधला होता. त्यावरून भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य करत आता जुडेगा भार, जीतेगा भारत म्हणत त्यांनी भाजपला ठाकरे शैलीत जळगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former cm Uddhav Thackeray) यांनी भाजपला सुनावले आहे. इंडिया (India) शब्दावरून त्यांनी केलेली टीका, इंडिया बदलून भारत करणाऱ्या भाजपला सांगताना त्यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी होय इंडियाही आमचाच, भारतही आमचाच आणि हिंदुस्थानही आमचाच असल्याचे सांगत त्यांनी भाजपला भविष्यात केंद्रातूनही आणि राज्यातूनही हद्दपार करायचे असा थेट इशाराच त्यांनी दिला.

आमची दोस्ती अजमवलीत

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना त्यांनी केंद्रावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, आजपर्यंत तुम्ही आमची दोस्ती अजमवलीत आता तुम्ही मशालीची धग अनुभवा असा इशारा देत केंद्रातून आणि राज्यातूनही भाजपला हद्दपार करायचे आहे असं आवाहन त्यांनी नागरिकांनी केला आहे.

कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी

भाजपकडून शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी करुन ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिले. ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही –हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गटानेही पोस्टर बाजी करत आणि सडेतोड उत्तर देत त्यांना उत्तर दिले की, ‘मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही’ अशा शब्दात त्यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp