जयंत पाटलांना भाजपची ऑफर? जितेंद्र आव्हाड म्हणाले…”सत्ता येते जाते”

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर जयंत पाटील अजित पवार (Ajit pawar) गटात सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू होत्या. या सबंधित वृत्त देखील समोर आले होते. या बातम्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन ‘मी साहेबांसोबतच आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नका, असे स्पष्टीकरण दिले होते. या सर्व घडामो़डींवर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(jayant patil meet union minister amit shah ncp jitendra awhad reaction)

जयंत पाटील अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाली होती. या चर्चेवर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांच्यासोबत माझं बोलण झाले आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की,लढायचंय आता थांबायचं नाही असे, जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच मला वाटत नाही प्रत्येक नेत्याने दररोज स्पष्ट करावं की, “आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत.” आम्ही मागेच सांगितलं, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” आणि या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही, असे देखील जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : ”अजित पवारांनी 20 वर्ष एक रूपयाही दिला नाही”, गिरीश महाजनांचं मोठं विधान

जयंत पाटील यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरु आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,मंत्री होणार आहेत, गावातून लोक बोलावली आहेत, अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय याची आम्हाला कल्पना असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हाला कधीचं क्षमा करणार नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.

ADVERTISEMENT

जयंत पाटील काय म्हणाले?

“माझ्याविषयी गैरसमज पसरवू नका. मी शाहांना भेटलो याचे काही पुरावे आहेत का? मी संध्याकाळी आणि आज सकाळी पवारसाहेबांसोबत होतो. रात्री दीड वाजेपर्यंत अनिल देशमुख, राजेश टोपेंसोबत बैठकीत होतो. माझ्यासाठी मनोरंजन आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : राहुल गांधी लोकसभेत कधी दिसणार, शिक्षेला स्थगिती पण खासदारकी कुठे अडकलीये?

“मी माझ्याच घरी आहे. तुम्हीच बातम्या करतायत, तुम्हीच खुलासे करा. आमच्या पक्षवाढीसाठी बैठका सुरू आहेत. माझ्यावर कुणाचा दबाव नाही. मला कुणी सांगितलेले नाही किंवा मी असं काही बोललेलो नाही. कुणाशीच चर्चा झालेली नाही. मी दररोज पवारसाहेबांना भेटतोय. माझी रोज करमणूक सुरू आहे. त्यात काल दुपारी भर पडली. आज सुरू आहे. महाराष्ट्रात माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी आहे. हे योग्य नाही”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

“मी आता पार्टी ऑफिसला चाललोय. मी कुणालाच भेटलेलो नाही. पवारांसोबत राहणार शेवटपर्यंत? हेा काय विचारायचा प्रश्न आहे. मी साहेबांसोबतच आहे. गैरसमज पसरवू नका. बार-बार मत गलतफहमी मत करो. घरी बसून बातम्या पसरवू नका. महाराष्ट्रातील जनता मला ओळखून आहे”, असे जयंत पाटील सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT