Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात, नव्यानं नाव नोंदणी केलेल्या बहिणींसाठीही आनंदाची बातमी

मुंबई तक

Aaditi Tatkare on Ladki Bahin : 9 ऑक्टोबरपर्यंत आपण 2 कोटी 34 लाख महिलांचा समावेश होता, त्यामध्ये आता वाढ होणार आहे असं म्हणत ज्यांची आधार सिडींग झाली आहे त्यांच्यासाठीही आदिती तटकरे यांनी महत्वाची बातमी दिली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता जमा

point

आदिती तटकरे यांची माहिती

point

आधार सिडींग झालेल्या महिलांसाठीही अपडेट

Ladki Bahin December Installment : लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. विधानसभा निवडणुकीमुळे रखडलेला लाडक्या बहिणांचा डिंसेबरचा हप्ता अखेर त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना ऑक्टोंबरमध्येच देण्यात आला होता. आतापर्यत 7500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. 

लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, त्याच बरोबर फॉर्म भरुनही ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांचा हप्ता कधी जमा होणार असे प्रश्न उपस्थित होत असतानाच आता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्वाची अपडेट दिलीय.

आदिती तटकरे काय म्हणाल्या? 

हे ही वाचा >> Dhananjay Munde Beed : बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंच्या हातातून जाणार का? CM फडणवीस, अजितदादा काय निर्णय घेणार?

"मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या लाडक्या बहि‍णींच्या सन्मान निधीची सुरूवात आपण करत आहोत. 9 ऑक्टोबरपर्यंत आपण 2 कोटी 34 लाख महिलांचा समावेश होता. त्यानंतर आता ज्यांची आधार सीडींग झाली आहे, अशा इतर महिलांनाही लाडक्या बहि‍णींचा हप्ता मिळणार आहे. येत्या 4-5 दिवसात या लाभाचं वितरण करण्यात येणार आहे" असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. 

 

हे ही वाचा >> CM Devendra Fadnavis यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या 12 सोशल मिडीया युजर्सविरोधात FIR, यादीत कोणकोणती नावं?

त्यामुळे पुढच्या ३ ते ४ दिवस लाभार्थी असलेल्या लाडक्या बहीणींना, त्याच बरोबर आधार सीडींग झालेल्या नवीन महिलांना सुद्धा हप्ता वितरीत केला जाणाक असल्याच तटकरेंनी सांगितलंय.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp