MNS: 'कुंभमेळ्याला गेलेले लाखो लोक...', राज ठाकरेंची पुन्हा एकदा तुफान टीका
Raj Thackeray criticizes Ganga river pollution: गंगा नदीचं प्रदूषण आणि कुंभमेळ्यातील अस्वच्छता यावरून राज ठाकरेंनी त्यांच्या गुढी पाडवा मेळाव्यात जोरदार टीका केली आहे. पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

Raj Thackeray: मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (30 मार्च) मुंबईतील शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत कुंभमेळ्याबाबत सडेतोड विधान केले. त्यांनी गंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत कुंभमेळ्यातील पाण्याच्या दूषित अवस्थेवर जोरदार टीका केली. कुंभमेळ्यात स्नानासाठी जे लोकं गेले होते त्यातील लाखो लोकं हे आजारी पडले. असा दावा करत राज ठाकरेंनी गंगेतील दूषित पाण्यावर परखड भाष्य केलं.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून आणलेलं पाणी पिण्यास राज ठाकरेंनी नकार दिला होता. त्यावरून राज ठाकरेंवर बरीच टीकाही झाली. पण आजच्या सभेत या सगळ्या टीकाकारांना राज ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं
गंगा नदी आणि कुंभमेळ्यावर राज ठाकरेंनी केलेली टीका जशीच्या तशी...
'आमच्या बाळा नांदगावकरने कुंभमेळ्यातून पाणी आणलेलं. मी म्हटलं त्यांना पाणी पिणार नाही. तर नव्याने वारं शिरलेल्यांना वाटलं की, मी कुंभमेळ्याचा अपमान केला.. वेडे आहात का? आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे, आणि आतमध्ये गेल्यावर अहहह.. असं झालं. म्हटलं अहहहह नाही खालून प्रेत गेलं असेल एखादं..'
हे ही वाचा>> बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून आणलेलं गंगेचं पाणी Raj Thackeray का प्यायले नाहीत?
'आपल्या देशातील नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे. ज्याला आपण माता म्हणतो नदीला, देवी म्हणतो.. त्या नद्यांकडे राज्यकर्त्यांचा.. आज नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे. मला आजही आठवतंय की, गंगा साफ करावी असं म्हणणारी पहिली व्यक्ती मला आठवतेय. ती म्हणजे राजीव गांधी.'










