Lok Sabha 2024 : दक्षिणेचा किल्ला भेदण्यासाठी मोदी मैदानात, भाजपचं ‘मिशन साऊथ’ काय?

भागवत हिरेकर

Lok Sabha Elections 2024 BJP Mission South : दक्षिण भारताच्या राजकारणात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपची रणनीती सांस्कृतिक राष्ट्रवाद, भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुतेचे धोरण आणि केंद्र सरकारच्या विकास योजनांच्या मदतीने आपली विश्वासार्हता प्रस्थापित करण्याभोवती असल्याचे दिसते.

ADVERTISEMENT

What is BJP's strategy for expansion in the south? Before this, it is necessary to discuss what are the challenges facing BJP in the South?
What is BJP's strategy for expansion in the south? Before this, it is necessary to discuss what are the challenges facing BJP in the South?
social share
google news

PM Modi eyes on South before Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले आणि भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही हजेरी लावली. पीएम मोदींनी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 20 हजार कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

देशात लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या वर्षातील पंतप्रधान मोदी एखाद्या राज्यात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजप संदर्भात उत्तर विरुद्ध दक्षिण असा वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला काही महिन्यांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) ‘मिशन दक्षिण’शी जोडले जात आहे.

दक्षिणेत विस्तारासाठी भाजपची रणनीती काय? या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी हे आधी बघावं लागेल की, दक्षिणेत भाजपसमोर कोणती आव्हाने आहेत. हिंदी पट्ट्यातील पक्षाच्या प्रतिमेतून बाहेर पडणे हे दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी अजेंडा आज तक 2023 च्या व्यासपीठावर सांगितले होते की, 2024 च्या निवडणुकीनंतर हा वाद संपेल. निवडणुकीच्या वर्षाच्या सुरुवातीसह भाजपने विरोधकांचा दक्षिणेचा बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी आपला सर्वात मोठा चेहरा पीएम मोदींना मैदानात उतरवले आहे, त्यामुळे याचा स्वतःचा धोरणात्मक अर्थही आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp