Lok Sabha 2024 : शिंदे-पवारांना करावा लागणार त्याग, भाजपला हव्या ३० जागा!
lok sabha 2024 election, Maharashtra seat sharing : महायुतीमध्ये भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष आहेत. त्यामुळे कुणाला किती जागा मिळणार याची उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT
Lok Sabha elections 2024 seat sharing : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्या कामाला लागल्या आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. दुसरीकडे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने ३० जागा लढवण्याची तयारी सुरू केल्याचे समोर आले आहे. भाजपने ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्रात ठेवलं आहे. त्यामुळे अधिकाधिक जागांवर पक्षाचे उमेदवार देण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना त्याग करावा लागू शकतो.
महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्त जागा लढवण्याचा प्रयत्नात भाजप असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे. ४८ जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर आपले उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
हेही वाचा >> शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? नार्वेकर देणार ऐतिहासिक निकाल!
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने २८४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत दुसऱ्यांदा बहुमत मिळवलं होतं. २०२४ मध्ये ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणाही भाजपकडून दिली जात आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपला देशातील ४७५ पेक्षा अधिक जागा लढवायच्या आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
लोकसभा २०२४ साठी भाजपचा नेमका काय आहे प्लॅन?
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० जागांवर भाजपला यावेळी निवडणूक लढवायची आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात २५ जागा लढवल्या होत्या. महाराष्ट्राबरोबर राजस्थानमधील सर्व २५ लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने १ जागा हनुमान बेनिवाल यांना सोडली होती.
हेही वाचा >> “अजित पवारांना इतक्या जागा देणं शक्य नाही”, महायुतीत नवा पेच
शिंदे-पवारांना करावा लागणार त्याग?
महायुतीतील जागावाटपासंदर्भात सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजप २६ जागा लढवणार आणि उर्वरित २२ जागा शिंदे-पवार यांना सोडणार, असं जागावाटपाचं प्राथमिक सूत्र असल्याचे म्हटले होते. त्यातही अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. पण, महायुतीत भाजपने ३० जागा लढवण्याचा निर्णय घेतला, तर शिंदे-पवारांना तो निर्णय मान्य करावा लागेल, असेच राजकीय चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे हा निर्णय झाला, तर शिंदे-पवारांना तडतोड करण्याशिवाय पर्याय नसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT