Lok Sabha : महायुतीचे जागा वाटप कधी? शिंदेंच्या मंत्र्याने दिली महत्वाची माहिती
रत्नागिरी, सिंधुदुर्गात भाजपकडे साडे सहा लाख मतदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यावर माझ्याकडे साडे आठ लाख मतदार आहेत असाही टोमणा उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे.
ADVERTISEMENT
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक होणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीत थेट टक्कर होणार आहे. त्यामुळे जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती फॉर्म्युला ठरवते आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसमोर प्रत्येकी 12 जागांचा प्रस्ताव ठेवला होता.मात्र या प्रस्तावावर महाविकास आघाडीकडून विशेष असा प्रतिसाद मिळाला होता. असे असतानाच आता जागावाटपावरून महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची बातमी समोर आली आहे. महायुतीचे जागावाटप कसे होणार आहे, याबाबतची माहिती आता शिंदे गटाच्या आमदाराने दिली आहे. (loksabha election 2024 mahayuti seat sharing formula uday samant mahavikas aghadi maharashtra politics)
ADVERTISEMENT
राज्यात भाजप लोकसभेच्या 26 जागा लढणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी गटाला मिळून 22 जागा देणार असल्याचे बोलले जात होतं. पण अद्याप महायुतीचा फॉर्म्युला ठरला नाही, केवळ चर्चा झाल्या आहेत. बोलणी सूरू आहे. ज्याच्याकडे ज्या जागा आहेत. त्या बेसिस मानल्या जातील आणि त्यात फेरबदल करायचे म्हटल्यास चर्चेला वाव असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
हे ही वाचा : संतापजनक! बलात्कार पीडितेने मदतीची याचना केली, तब्बल 11 जणांनी मिळून…
आता महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे. महायुतीच्या फॉर्मुल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे भाजपच्या कोअर कमिटीसोबत दिल्लीत एकत्र बसून यावर निर्णय घेतील. यात आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही, कारण आम्ही नेतृत्व मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे मानतो. त्यामुळे शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे असे उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले.
हे वाचलं का?
रत्नागिरी, सिंधुदुर्गात भाजपकडे साडे सहा लाख मतदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यावर माझ्याकडे साडे आठ लाख मतदार आहेत असाही टोमणा उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे.
हे ही वाचा : कोल्हापुरात पाटील-महाडिक वाद पेटणार! साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना बेदम मारहाण
दरम्यान महाविकास आघाडीच्या जागवाटपात ठाकरे गटाला 19 ते 21, काँग्रेसला 13 ते 15, तर शरद पवार गटाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर 48 पैकी 44 मतदारसंघांचे वाटप झाले असून चार जागांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसमोर प्रत्येकी 12 जागा लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अद्याप तरी महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटपाची संभाव्य आकडेवारीच समोर आली आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या खऱ्या आकड्याची प्रतिक्षा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT