Maharashtra Budget 2025: अजितदादांचं Dream बजेट तुम्ही पाहिलं का? 5 वी घोषणा तर...
Maharashtra Budget 2025 Ajit Pawar: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला. समजून घ्या या अर्थसंकल्पातील 7 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (10 मार्च 2025) रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील 7 महत्त्वाचे मुद्दे
1. कृषी आणि ग्रामीण विकास
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी 'मुख्यमंत्री कृषी समृद्धी योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि जलसंधारण प्रकल्पांना विशेष भर देण्यात येणार आहे.
- ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ५,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा यांचा समावेश आहे.
2. शिक्षण आणि कौशल्य विकास
- 'सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण' या उद्दिष्टाने राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या सुधारणेसाठी ३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.