Maharashtra New CM: अमित शाहांच्या घरी बैठकीत 'हे' ठरलं, अजितदादांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी?
Ajit Pawar NCP: अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची जी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यामध्ये सर्वाधिक फायदा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

Ajit Pawar NCP: अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची जी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यामध्ये सर्वाधिक फायदा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

सत्ता वाटपात सर्वाधिक फायदा अजित पवारांचा?

अजित पवारांच्या पक्षाला मिळणार अनेक महत्त्वाच्या गोष्टी?
Ajit Pawar: नवी दिल्ली: महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे स्पष्ट झालं की, मुख्यमंत्री भाजपचाच होणार. आता फक्त नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील घरी आज रात्री यासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. पण याच बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये सर्वाधिक फायदा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा होत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
अमित शाह यांच्या निवासस्थानी जी बैठक पार पडली त्यामध्ये महायुतीचे तीनही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. ही बैठक सुमारे 2 तास चालली. दरम्यान, त्याआधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शहा यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. जिथे दोघांमध्ये तासभर चर्चा झाली.
हे ही वाचा>> Maharashtra CM: फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य, एकनाथ शिंदे मात्र... 'त्या' फोटोने सगळंच केलं क्लिअर?
अमित शाह यांच्या बैठकीत अजित पवारांबाबत नेमकं काय ठरलं?
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असल्याने ते आता उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, दुसरीकडे अजित पवार हे मात्र पुन्हा उपमुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काही गोष्टी निश्चित झाल्या असल्याचं समजतं आहे. त्यामुध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थखातं पुन्हा देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद देखील देण्यात येईल अशी चर्चा झाल्याचं समजतं आहे.