ना अजित पवारांकडे गेले ना शरद पवारांकडे? राष्ट्रवादीचे ते 6 आमदार कोण?
शरद पवारांच्या बैठकीला 15 आमदार उपस्थित होते, तर अजित पवार यांच्या बैठकीला 32 आमदार उपस्थित होते. 6 आमदार दोन्हीही बैठकांना हजर नव्हते.
ADVERTISEMENT

NCP Ajit Pawar Sharad Pawar : राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी बंड केल्यानंतर बुधवारी मुंबईत दोन बैठका पार पडल्या. अजित पवार यांनी एमईटी इथल्या सभाग्राहात बैठक आयोजित केली होती, तर शरद पवारांनी वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठकीचं आयोजन केलं होतं. बैठकीच्या निमित्ताने दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अजित पवारांनी त्यांच्या भाषणात पवारांवर अनेक आरोप देखील केले, त्याचबरोबर निवडणुक आयोगाकडे आपणच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीची लढाई निवडणूक आयोगाबरोबरच सर्वोच्च न्यायालयात जाणार असंच जाणकारांकडून सांगितलं जात आहे. असं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कुणाचा याचा देखील निर्णय होईल.
तरच अजित पवारांवरील कारवाई टळणार
शिवसेनेच्या प्रकरणामध्ये विधिमंडळातील आमदारांच्या संख्येवरुन निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. दोन तृतीयांश आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देखील आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश आमदार बाहेर पडले, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही. त्याचप्रमाणे अजित पवारांसह दोन तृतीयांश आमदार बाहेर पडल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकणार नाही.
वाचा >> ‘आव्हाडांसह 2-3 जण प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले’, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत दोन तृतीयांश आमदारांची संख्या होण्यासाठी अजित पवारांना ३६ आमदारांची गरज आहे. सध्या कोणाकडे किती आमदार आहेत ते पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून