OBC Issue : ‘ही राष्ट्रवादीची नौटंकी’, चंद्रशेखर बावनकुळे का संतापले?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच ओबीसींची शत्रू आहे, असा आरोप बावनकुळेंनी केला.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics Latest News : ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपूर्ण इतिहासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला, त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत,” अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला. राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर देताना ‘भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही’, असेही ते म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे ते पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी कॉंग्रेसला ओबीसी समाजाची निवडणुकीपूर्वी आठवण आली आहे. राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर ही केवळ नौंटकी असून 2024 च्या निवडणुकीपूर्वी खोटे प्रेम उतू येत आहे.”
हेही वाचा >> 2024 लोकसभा निवडणूक: BJP-शिंदेंसाठी धोक्याची घंटा, मविआ मारणार मोठी मुसंडी?
“भाजपाने देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान करून प्रथमच ओबीसी समाजाला न्याय दिला. त्यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा प्रदान केला. केंद्रात ओबीसी समाजाचे 27 मंत्री आहेत. महाराष्ट्रात प्रथमच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींचे मंत्रालय स्थापन करून राज्यातील ओबीसींना न्याय दिला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर इम्पेरिकल डेटाचे नियोजन करून ओबीसींना न्याय मिळवून दिला”, असं बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस ढोंग करतेय, बावनकुळेंचं टीकास्त्र
“महाविकास आघाडी सरकार असताना ओबीसींना न्याय मिळू शकत नाही, या कारणावरून तत्कालीन ओबीसी आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे सरकार आले तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत इम्पिरिकल डेटासाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आता ढोंग करत आहे. भाजपवर खोटे आरोप करत आहेत”, असा पलटवार बावनकुळे यांननी केला.