लोकप्रियतेचा मुद्दा वगळला, देवेंद्र फडणवीस झळकले! शिवसेनेकडून ‘डॅमेज कंट्रोल’

मुंबई तक

या जाहिरातीमुळे भाजपमधून उमटलेल्या नाराजीच्या सूराचं ‘डॅमेज कंट्रोल’ जाहिरातूनच करण्यात आलं. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचा फोटोही झळकला आणि लोकप्रियतेचा मुद्दाही गायब झालेला दिसला आहे.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis with Eknath Shinde in Shiv Senas advertisement
Devendra Fadnavis with Eknath Shinde in Shiv Senas advertisement
social share
google news

Maharashtra Politics News Today : ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’ या जाहिरातीने भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडली. भाजपमधून नाराजीचा सूर उमटला आणि पडद्यामागेही बऱ्याच घटना घडल्या. या सगळ्या नाट्यानंतर ती जाहिरात शिवसेनेने दिली नाही, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला. पण, या जाहिरातीमुळे भाजपमधून उमटलेल्या नाराजीच्या सूराचं ‘डॅमेज कंट्रोल’ जाहिरातूनच करण्यात आलं. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या या जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचा फोटोही झळकला आणि लोकप्रियतेचा मुद्दाही गायब झालेला दिसला आहे. (maharashtra politics news marathi)

‘त्या’ जाहिरातीमध्ये काय होतं?

“राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्टात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.”

“सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल. म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.”

हेही वाचा >> Shiv Sena UBT : “जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का?”

“मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली आहे”, असा मजकूर मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp