MSCB Scam : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण; नवीन चार्जशीटमध्ये 14 नावे, अजित पवारांचे नाव आहे का?

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाने (ED नवीन चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये 14 जणांची नावे आहे. या 14 जणांमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये आता राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आहे का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण याआधीच्या चार्जशीटमध्ये अजित पवांराचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे नवीन चार्जशीटमध्ये अजित पवारांच्या नावाचा समावेश केला आहे का? हे जाणून घेऊयात. (maharashtra state cooperative bank scam case 14 leaders name shiv sena congress and ncp)

ADVERTISEMENT

नवीन चार्जशीटमध्ये काय?

पहिल्या चार्जशीटमध्ये राम गणेश गडकरी साखर कारखाना,अहमदनगर संबंधित राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रजक्त तनपूरे आणि त्यांचे वडील प्रसाद तनपूरे यांची नावे आहेत. त्यासोबत माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमूख, प्रसाद शुगर अँड अलायट अँग्रो प्रोडक्ट आणि तक्षशिला या व्यक्ती आणि कंपन्यांविरूद्द चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

शिंदे गटाच्या नेत्याचे नाव

जालना को ऑपरेटीव्ह साखर कारखान्या संबंधित प्रकरणात शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांचे नाव आहे. तसेच शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि औरंगाबादचे उद्योगपती समीर मुळेंचे नाव आहे. औरंगाबादचे उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक जुगलकिशोर तापडिया आहेत. अर्जुन शुगर इंडस्ट्री आणि तापाडिया कस्ट्रक्शन यांच्याविरोधात ही तिसरी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

अजित पवारांना दिलासा

अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ही पहिलीच चार्जशीट समोर आली आहे. या चार्जशीटमध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान याआधी देखील एप्रिल 2023 मधल्या चार्जशीटमध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव वगळले होते.

प्रकरण काय?

आघाडी सरकारच्या काळात अजित पवार शिखर बँकेचे अर्थात महाराष्ट्र सहकारी को ऑप बँकेचे अध्यक्ष होते.त्या काळात या बँकेत 25 हजार कोटीचा घोटाळा झाला होता. या बँक घोटाळ्यात 70 वेगवेगळ्या पक्षाची नावे समोर आली आहेत. या घोटाळ्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिक जाधव या प्रकरणी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात ईडीने जरंडेश्वर सहकारी कारखाना देखील जप्त केला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT