Manoj Jarange: 'तू काय बधिर झालेला मंत्री आहेस?'; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Manoj Jarange Patil On DCM Devendra Fadnavis : मराठा आंदोलक (Maratha protestors) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. त्यांच्या मागण्या लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10% टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं, तरीही जरांगेंना ते मान्य नाही आहे. ओबीसीमधून आरक्षण पाहिजे यासाठी आता जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केलं आहे.

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी (14 मार्च) बीड जिल्ह्यातील वडवणी येथे मराठा समाजाची संवाद बैठक घेतली. अनेक मराठा समाज बांधवानी या बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी मात्र, जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत टीका-टिप्पण्या केल्या.

मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

'भाजपचे लोक माझ्याविषयी बनावट व्हिडीओ तयार करत असून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. मी मराठा समाजापासून लांब गेलो पाहिजे असा कट रचण्यात आला आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे की मनोज जरांगे पाटलांनी घाबरु नये.' असं जरांगे पाटील बैठकीत म्हणाले. 

हे वाचलं का?

फडणवीसांवर जरांगेंचा हल्लाबोल!

संवाद बैठकीत बोलत असताना जरांगे म्हणाले की, 'आजपासून देवेंद्र फडवणीस यांना आहो जाहो बोलणं बंद. देवेंद्र फडणवीस यांनी पातळी सोडली आहे. तुझ्या एसटी रिकाम्या जातात, आम्ही काय करावं? तू काय बधिर झालेला मंत्री आहे का? तू मला जेलमध्ये टाक मराठे काय करतात बघ. माझा मराठ्यांना शब्द आहे. जेलमध्ये सडेल पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. देवेंद्र फडवणीस चिल्लर चाळे करतात. मस्ती करणाऱ्याला आव जाव करत नसतात. मराठ्यांच्या नादी लागाल, तर तुमचं राजकारण संपून जाईल.'

पुढे ते म्हणाले की, ' तू मला सागर बंगल्यावर येऊ द्यायला पाहिजे होतं, मग तुला कळलं असतं. इतक्या खालच्या दर्जाचा गृहमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला आहे.' असं म्हणत जरांगे पाटलांनी फडणवीसांनी टीकास्त्र सोडले.

ADVERTISEMENT

'तुमचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही', फडणवीसांना जरांगेंचा थेट इशारा

'आपल्या विरोधात मराठा समाजाचा इमानदार पोरगा लढतोय, याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे होतं. तर तुम्हाला खरे राजकारणी म्हटलं गेलं असतं. पण देवेंद्र फडणवीसांची वृत्ती नीच आहे. मी तुम्हाला वडवणीतून आव्हान देतो आहे. तुम्ही मला भलेही बदनाम करा. पण समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात, तर तुमचा 48 पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही.' असा थेट इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT