‘…तर लावा सलाईन, लावा गोळ्या, महिन्याभर चालून द्या’, CM शिंदेंसोबत फोनवरील चर्चेनंतर जरांगे पाटील म्हणाले
मुख्यमंत्री शिंदे उद्या उपोषणस्थळी आले तर उपोषण मागे घेणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. पण जर नाही आले तर लावा सलाईन, लावा गोळ्या, महिन्याभर चालून आंदोलन असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
मराठा आरक्षण आणि मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले उपोषण आजच्या आंदोलनाच्या 15व्या दिवशी कायम आहे. मंगळवारी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे उद्या उपोषणस्थळी आले तर उपोषण मागे घेणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. पण जर नाही आले तर लावा सलाईन, लावा गोळ्या, महिन्याभर चालून आंदोलन असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. (manoj jarange patil continue agitation maratha reservation cm eknath shinde)
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी रात्री उशिरा उदय सामंत, अर्जुन खोतकर, संदिपान भुमरे आणि राजेश टोपे आले होते. यावेळी या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा घडवून आणली. साधारण अनेक मिनिटे चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
न्यायमुर्ती शिंदे कमिटीबाबत आणि टास्कफोर्सबाबत चर्चा झाली.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणावर सकारात्मक असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.तसेच मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला होता. आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ द्यायला तयार आहोत,असे देखील जरांगे पाटील म्हणाले.पहिल्या समितीने 3 महिने काम केले नाही, त्याबाबत तु्म्हाला माहित नाही,नाहितर तुम्ही झापलंही नाही , त्यामुळे तीन महिने वाया गेले, एक महिन्याचा वेळ मागितला होता. आम्ही तुम्हाला तो दिला आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष यावं आम्ही आमरण उपोषण सोडतो. मी आता सहकाऱ्यांशी बोलतो आणि उद्या मुख्यमंत्री आले तर उपोषण सोडेन, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. तसेच मुख्यमंत्री आल्यावर आम्हाला आणखीण आत्मविश्वास मिळेल, असे देखील जरांगे पाटील म्हणाले. जर मुख्यमंत्री आलेच नाही आणि त्याचा प्रतिनिधी आला तर काय असा सवाल पत्रकारांनी केला, यावर जरांगे पाटील म्हणाले, लावा सलाईन, लावा गोळ्या महिन्याभर चालून द्यायचं आंदोलन असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आंदोलनस्थळी उपस्थित राहतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT