Maratha Morcha: ‘अजितदादा सोबत आल्याने पवार चिडलेत’, जालना लाठीहल्ल्यावर बोलताना फडणवीसांनी डिवचलं
Maratha Morcha: अजित पवार आमच्यासोबत आले आहेत त्यामुळे पवार साहेब नाराज आहेत. चिडलेले आहेत म्हणून ते असे आरोप करत आहेत.’ असं देवेंद्र फडणवीस यांनी जालना लाठीहल्ल्यावरून पवारांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis vs Sharad Pawar on Maratha Morcha: मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण आणि आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी बेछूट लाठीहल्ला चढवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ()maratha morcha sharad pawar is angry because ajit pawar came with us devendra fadnavis taunts pawar while speaking on jalna lathi charge)
ADVERTISEMENT
‘आत्ताच्या परिस्थितीत पवार साहेबांच्या जवळच्या लोकांनी त्यांना सोडून आमच्यासोबत सरकार तयार केल्यामुळे पवार साहेब फार नाराज आहेत. चिडलेले आहेत, व्यथित आहेत. त्यामुळे ते असे आरोप करत आहेत.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
जालना लाठीहल्ला: देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना प्रत्युत्तर..
‘माझं आवाहन आहे की, सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे. राज्यात याचा कुठेही वेगवेगळ्या घटना घडणं हे योग्य नाही. त्यासोबत माझी राजकीय पक्षांनाही आणि राजकीय नेत्यांनाही विनंती आहे की, मी शब्द वापरतोय त्यासाठी माफ करा.’
हे वाचलं का?
‘पण बहती गंगा मे हाथ धोना.. हे बंद करा. हे करणं योग्य नाही हे राज्याच्या हिताचं नाही. कालपर्यंत जे लोकं मराठा आरक्षण मिळू शकत नाही.. मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही. असे म्हणणारे ज्येष्ठ नेते आज अचानक त्याठिकाणी लगेच फोनो देतायेत.. मग म्हणतायेत सरकारने जाणीवपूर्ण केलंय का, एका समाजाबद्दल आकस आहे का. माझा त्यांना सवाल आहे की, त्यांनी त्या समाजाबद्दल काय केलं किंवा त्या समाजाच्या आरक्षणाबाबत काय केलं? हे एकदा दाखवावं.’
‘आम्ही ते लोकं आहोत ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. आम्ही हायकोर्टात टिकवून दाखवलं. सुप्रीम कोर्टात तुमच्या काळात ते गेलं. पण हरकत नाही. मला असं वाटतं की, हे जे लोकं राजकारण करतायेत यांनी राजकारण तात्काळ बंद केलं पाहिजे. हे अशोभनीय आहे.. असं राजकारण अशोभनीय आहे. शांतता ठेवली पाहिजे..’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maratha Morcha: फडणवीस म्हणतात, ‘मराठा आंदोलकांनी आधी दगडफेक केली, म्हणून पोलिसांनी…’
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षण परत मिळविण्याच्या संदर्भात कारवाई करत आहेत आणि सरकार कटीबद्ध आहेत.’
ADVERTISEMENT
‘माझं आंदोलकांना एवढंच आवाहन आहे की, सरकार जर गंभीरतेने काम करत आहे तर त्यांनी रस्त्यावर येण्याची, जाळपोळ करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याची एक पद्धती आहे जी पद्धती सरकारने सुरू केली आहे.’
‘कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब केला नाही तर समाजाला फसवल्यासारखं होईल. समाजाला फसवायचं कारण नाही.. त्यामुळे त्यानुसार कारवाई चालली आहे.’
‘मला त्यासोबत.. मी पुन्हा सांगतो मी कोणावरही आरोप करत नाही. पण काही राजकीय पक्ष याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे कार्यकर्ते देखील मराठा समन्वयकाच्या नावाने या ठिकाणी हिंसा पसरविण्याचं काम करत आहेत. त्यांनाही हात जोडून विनंती आहे. असं बिल्कूल करू नका.. अशाप्रकारे करणं योग्य नाही.’
हे ही वाचा >> Jalna लाठीहल्ला, ‘गृहमंत्र्याच्या मनातील भावना हीच पोलिसांची कृती’ शरद पवारांचा आरोप
‘हा काही राजकीय प्रश्न नाही. हा समाजाचा प्रश्न आहे. समाजाच्या प्रश्नावर जर तुम्ही एकत्रित येऊ शकत नसाल तर मला वाटतं की, समाजाबद्दल तुमच्या मनात कुठलंही प्रेम नाही. तुम्हाला केवळ यावर राजकारण करायचं आहे.’
‘पवार साहेब मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याकांड झालं.. त्याठिकाणी 113 गोवारी समाजाचे लोकं हे मृत्यूमुखी पडले. त्यावेळी पवार साहेब पाहायला देखील गेले नाही किंवा राजीनामा देखील दिला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, आत्ताच्या परिस्थितीत पवार साहेबांच्या जवळच्या लोकांनी त्यांना सोडून आमच्यासोबत सरकार तयार केल्यामुळे पवार साहेब फार नाराज आहेत. चिडलेले आहेत, व्यथित आहेत. त्यामुळे ते असे आरोप करत आहेत. पवार साहेब मोठे नेते आहेत.. मी त्यांना उत्तर देणार नाही.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना या संपूर्ण प्रकरणावर प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT