Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही?, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maratha reservation mp supriya sule criticize devendra fadnavis mahayuti government manoj jarange patil agitation
maratha reservation mp supriya sule criticize devendra fadnavis mahayuti government manoj jarange patil agitation
social share
google news

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आमदार निलेश लंके, आमदार कैलास पाटील, आमदार राजू नवघरे या तीन आमदारांनी मुंबई मंत्रालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणावरून आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मराठा आरक्षणप्रश्नी आज राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. या आंदोलनाचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavsi) यांच्यावर विश्वास नाही का? असा खरमरीत सवाल सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला विचारला आहे.( maratha reservation mp supriya sule criticize devendra fadnavis mahayuti government manoj jarange patil agitation)

मराठा आरक्षण प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले, राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला केला आहे.

हे ही वाचा : महिला टिचर आणि बॉयफ्रेंड… विद्यार्थ्याच्या हत्येची अंगावर काटा आणणारी कहाणी जशीच्या तशी…

विशेष म्हणजे आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती. तेथे यासंदर्भात चर्चा होणार होती.राजभवन ते जेथे मंत्रीमंडळाची बैठक झाली ते सह्याद्री अतिथीगृह हे अंतर केवळ पाच ते सहा मिनिटांचे आहे. पण तिकडे या आमदारांपैकी कुणीही गेले नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सह्याद्री अतिथीगृह सोडून सत्ता पक्षातील आमदारांनी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. यावरून या आमदारांचा सरकारवर विश्वास राहिला नाहीए. या सरकारमध्ये धोरण लकवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली. त्यामुळे महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Tamil Selvan : भाजपच्या मुंबईतील आमदाराला तुरुंगवास, नेमकं प्रकरण काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT