Maratha Reservation: ”टिकणार असेल तर द्या नाहीतर…’, संभाजीराजे सर्वपक्षीय बैठकीत भडकले

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

maratha reservation sambhaji raje left all party meeting manoj jarange patil agitation eknath shinde devendra fadnavis
maratha reservation sambhaji raje left all party meeting manoj jarange patil agitation eknath shinde devendra fadnavis
social share
google news

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक सह्याद्रीवर सुरु आहे. या बैठकीत 15 ते 20 मिनिटे बसल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती सह्याद्रीवरून बाहेर पडले आहे. यावेळी संभाजीराजे यांनी माध्यमांसमोर बैठकीचा तपशील सांगितला आहे. मी बैठकीत 3 मुद्दे मांडले आहेत. हे माझे नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले मुद्दे आहेत. या मुद्यावर तोडगा काढल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नसल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट सांगितले आहे. (maratha reservation sambhaji raje left all party meeting manoj jarange patil agitation eknath shinde devendra fadnavis)

ADVERTISEMENT

सर्वपक्षीय बैठकीत मी माझा मुद्दा मांडला आहे. मी सरकारला स्पष्ट सांगितलं. जर न्यायिक पद्धतीने आरक्षण बसत असेल. जर तुम्ही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ शकत असाल, तर तुम्ही दिलं पाहिजे, जर बसत नसेल तर ते स्पष्टपणे सांगा असे संभाजी राजे यानी सरकारला ठणकावून सांगितले. पण नुसतं मराठा समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही काहितरी जीआर काढाल आणि जर तो कोर्टात अडकणार असेल ते कदापी चालणार नाही, अशी भूमिका संभाजी राजे यांनी घेतली.

हे ही वाचा : Ind vs Pak : कोहली, राहुलची तुफानी शतकी खेळी, पाकिस्तानसमोर ‘इतक्या’ धावांचे आव्हान

दरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाने जी मते मांडली आहेत, आणि तुमच्या समितीला ती मते पटत असतील, आणि ती कायद्याच्या चौकटीत बसत असतील तर तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिली पाहिजेत असे देखील संभाजीराजे यांनी भूमिका घेतलीय.

हे वाचलं का?

2014 ला नारायण राणे समितीच्या माध्यमातून आरक्षण दिले होते, ते टीकलं नाही. 2016 ला महामोर्चे सुरू झाले. 2018 ला आरक्षण देण्यात आले. जे हायकोर्टात टीकलं आणि 2021 ला सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल नाही, असा संपूर्ण आरक्षणाच्या लढ्याचा क्रम संभाजी राजेंनी सांगितला. तसेच सर्वपक्षीय बैठकीत मी 3 मुद्दे मांडले आहेत.

1) मागासवर्गीय आयोग पुर्नगठीत केली पाहिजे.
2) मराठा समाजाचे सर्वेक्षण केले पाहिजे
3) सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही.

ADVERTISEMENT

संभाजीराजे पुढे म्हणाले, मराठा समाज पुढारलेला वर्ग आहे. तुमच्याकडे अपवादात्मक परिस्थिती नसल्याने आरक्षण रद्द केले, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले. त्यामुळे हे मुद्दे माझे नाहीत तर सर्वोच्च न्यायालयाचे आहे. त्यामुळे या तीनही गोष्टी अंमलात आणा,अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत केल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : जुनं वैर… नवी मैत्री! चंद्रबाबू नायडूंच्या अटकेचा मेसेज काय? वाचा राजकीय Inside Story

मनोज जरांगे पाटलांमुळे सर्वपक्षीय बैठक सुचली, ही बैठक त्यावेळेस का घेतली नाही, असा सवाल संभाजीराजे यांनी केला. तसेच पुर्वी 49 मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा खेळ करू नका, असा हल्लाबोल संभाजीराजे यांनी सरकारवर केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT