Milind Deora : काँग्रेसमध्ये होणार मोठा भूकंप, मुंबईचा ‘हा’ नेता शिंदे गटात करणार प्रवेश?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

milind deora congress join shinde group shivsena south mumbai constituency bjp vs shinde shivsena
milind deora congress join shinde group shivsena south mumbai constituency bjp vs shinde shivsena
social share
google news

Milind Deora Join Shinde Group : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) या दोन्ही आघाड्यांची जागावाटपावर चर्चा सूरू आहे. ही चर्चा सूरू असतानाचा आता मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेस सोडून मिलिंद देवरा शिंदेंच्या (Eknath Shinde)  शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे आता काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसणार आहे. (milind deora congress join shinde group shivsena south mumbai constituency bjp vs shinde shivsena)

ADVERTISEMENT

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे आहे.त्यात ठाकरेंचे नेते अरविंद सावंत गेल्या दोन निवडणुकांमध्ये याच जागेवरून निवडून आले आहेत. त्य़ात शिवसेना फुटीनंतर देखील त्यांनी बंडखोरी न करता ते ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळे ठाकरे महाविकास आघाडीच्या जागावाटपात या जागेवरून अजिबात तडजोडीच्या विचारात नाही आहेत. एकूणच ठाकरे दक्षिण मुंबई मतदार संघातील या जागेवर दावा सांगणार आहेत.

हे ही वाचा : ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, ‘सेतू उद्धाटनात अटलजींचा फोटो नाहीच, राम मंदिरात तरी…’

शिंदेंची ताकद वाढणार

या कारणामुळेच मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता ऐन लोकसभेच्या तोंडावर मिलिंद देवरा यांनी पक्षाची साथ सोडल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर मात्र महायुतीची ताकद वाढणार आहे. इतकंच नाही तर दिल्ली वर्तुळातील त्यांचे संबंध पाहता शिंदे गटाने त्याला पक्षात प्रवेश देऊन त्याच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले आहे.

हे वाचलं का?

भाजप- शिंदे गटात संघर्ष पेटणार?

मिलिंद देवरा यांच्यासाठी शिंदे गट आग्रही असला तरी भाजपकडून देखील या जागांसाठी दोन नावे इच्छुक आहेत. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाचीही चर्चा सूरू आहे. त्यामुळे या जागेवरून भाजप-शिंदे गटात तडजोड होते की संघर्ष पेटतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : राऊतांचा PM मोदींना टोला, ‘लादीवर रेड कार्पेट टाकूनही सफाई दर्शन…’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT