Chhagan Bhujbal on Sharad Pawar : पवारांवर बोलताच बीडमध्ये भरसभेत गोंधळ, भुजबळांना कोणी रोखलं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chhagan bhujbal sharad pawar beed sabha
Chhagan bhujbal sharad pawar beed sabha
social share
google news

Chhagan Bhujbal on Sharad pawar : राज्यातील कालच्या रविवारचा दिवस राजकारण्यांच्या तीन सभांना गाजवला. हिंगोलीत उद्धव ठाकरे, परभणीमध्ये शासन आपल्या दारी हा भव्य दिव्य कार्यक्रम आणि बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सभेमुळे साऱ्या राज्याचे लक्ष या सभांकडे लागून राहिले होते. बीडमधील सभेसाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या होम पिचवर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांची जोरदार गर्दीही जमवली होती. मात्र नेत्यांची भाषणं सुरु झाल्यापासूनच अजितदादांच्या सभेत गोंधळ घालण्यास सुरुवात झाली होती. या सभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सभेत बोलताना राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांवर निशाणा साधताच उपस्थितींतून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. (Minister Chhagan Bhujbal criticized Sharad Pawar confusion meeting, speech stopped)

टीकेचा सूर अंगलट आला

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा ठरल्यापासूनच साऱ्यांचे त्या सभेकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी जोरदार तयारी करुन गर्दी केली होती. मात्र नेत्यांच्या टीकात्मक भाषणबाजीमुळे मात्र अजितदादांच्या सगळ्या सभेची हवाच निघून गेली. कारण दुपारी तीन वाजता असलेली सभा सायंकाळी सहा नंतर सुरु झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह निघून गेल्यानंतरही नेत्यांनी टीकेचा सूर लावल्याने पवार प्रेमींनी आपला रोष व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळेच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरु केल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्यामुळेच मंत्री छगन भुजबळ यांनी त्याचमुळे आपलं भाषण आवरतं घेतलं.

हे ही वाचा >>  Shiv Sena UBT: ‘भाजपच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना सत्काराचे…’, ‘सामना’तून जहरी टीका

मर्जी राखण्यासाठी आटापिटा

बीडमध्ये झालेल्या सभेतून धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासह शरद पवार यांच्या गटातील नेत्यांवर आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडे यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत शरद पवार यांची मर्जी राखरण्यासाठी अजित पवार यांच्यावर टीका करत असाल तर ते शरद पवार यांचे संस्कार नाहीत अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal: बारामतीत यु टर्न ते तेलगी प्रकरण, छगन भुजबळांचा शरद पवारांवर प्रश्नांचा भडीमार

भुजबळांच्या भाषणांने गोंधळ

मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी तेलगी प्रकरणाचा उल्लेख करत त्या प्रकरणात आपल्याबरोबर शरद पवार यांच्याही नावाचा उल्लेख केला होता. याची आठवण सांगितली. तर त्याच वेळी त्यांनी सांगितले की, माझ्या मतदार संघात येऊन माझी माफी मागितली मात्र अशा प्रकारे कोणाकोणाच्या मतदार संघात जाऊन तुम्ही माफी मागणार असा सवाल करताच सभेतील उपस्थितांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे छगन भुजबळांना आपलं भाषण आवरत घ्यावं लागलं. त्यानंतर झालेल्या अजितदादांच्या भाषणामध्ये मात्र त्यांनी शरद पवार यांच्यावर बोलणं टाळत सभा आवरती घेतली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT