आधी मुख्यमंत्र्याचा फोन टाळला, आता वडेट्टिवारांच्या भेटीला, किरण सामंतांचं नेमकं चाललंय काय?

मुंबई तक

आगामी लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता कोकणासह राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

ADVERTISEMENT

Minister Uday Samant's brother met Leader of Opposition Vijay Vadettiwar for the upcoming Lok Sabha
Minister Uday Samant's brother met Leader of Opposition Vijay Vadettiwar for the upcoming Lok Sabha
social share
google news

Shivsna-BJP: राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी ढवळून निघालं असतानाच शिंदे गटातील मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांच्या भावाच्या नाराजीनाट्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. कारण मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत (Kiran Samant) यांनी थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून चाललेलं नाराजी नाट्य आता स्पष्टपणे दिसू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी कोकणातील लोकसभेच्या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उदय सामंत यांनीही किरण सामंतांसाठी शब्द टाकला होता. त्यामुळेच आता विजय वडेट्टीवार यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी, ‘अरे किरण, काल किती फोन केले, उचलले नाहीत’ असं मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताना किरण सामंत यांना म्हटले होते. त्यानंतर त्या व्हिडीओवर चर्चाही खूप झाली. कारण किरण सामंत सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी इच्छूक असल्यामुळेच आता वडेट्टिवारांच्या भेटीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

हे ही वाचा >> Rishabh Pant : ‘मला वाटलं माझी वेळ संपली’, ऋषभ पंतने कार अपघाताचा सांगितला भयानक अनुभव

राजकीय वर्तुळात चर्चा

आगामी लोकसभेसाठी सगळ्याच राजकीय पक्षातून आता हालचाली चालू झाल्या आहेत. त्यामुळेच किरण सामंत आणि विजय वडेट्टीवार यांच्या भेटीमुळेही चर्चेला उधाण आले आहे. उदय सामंतांनीही शिंदेकडे शब्द टाकल्याने आता भाजप आणि शिंदे गटामध्ये नेमकं काय होणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी रस्सीखेच

आगामी लोकसभेसाठी भाजपही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आग्रही असणार आहे. मात्र उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आता इच्छूक असल्याने भाजपचीही गोची झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात भाजप आणि शिंदे गटात या जागेसाठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र दिसून येणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp