MLAs Disqualification Case : “ठाकरेंचा शिंदेंबद्दलचा ‘तो’ ठराव बनावट”

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

eknath shinde faction lawyer serious allegations on uddhav thackeray faction
eknath shinde faction lawyer serious allegations on uddhav thackeray faction
social share
google news

MLA Disqualification Case Maharashtra : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर गुरुवारी (23 नोव्हेंबर) झालेल्या सुनावणीत एकनाथ शिंदेंचे वकील महेश जेठमलानी दुसरा मुद्दा मांडला. एकनाथ शिंदे सुरतला निघून गेल्यावर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवले. पण, याच मुद्द्यावरून जेठमलांनी गंभीर दावा केला. शिंदे गटाने सलग दोन दिवस दोन मुद्द्यावरून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं. (Shiv Sena mlas disqualification case Mahesh : Shinde group’s lawyer Mahesh Jethmalani has claimed that There was no resolution passed to remove Eknath Shinde from the post of group leader of shivsena.)

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी करण्यात आली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आधी व्हीप बनावट असल्याचा आरोप केला. त्यानंतर गुरुवारी झालेल्या सुनावणीत शिंदेंना गटनेता पदावरून हटवण्याचा ठरावच बनावट असल्याचा दावा शिंदे गटाने केला.

शिंदे गटाचे वकील जेठमलानींनी काय केला युक्तिवाद?

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांची विधिमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रकियेबद्दल जेठमलानींनी काही मुद्दे उपस्थित केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “किती तो निर्लज्जपणा?”, ठाकरे गट संतापला, शिंदेंना दिला इशारा

“एकनाथ शिंदेंनी उठाव केल्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावली. त्या बैठकीत एकनाथ शिंदेंना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली. त्या ठरावावर मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड यांनी सह्या केल्या. पण, त्यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या नव्हत्या. त्यांच्या सह्या या बोगस आहेत”, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.

सुनील प्रभूंनी शिंदे गटाला काय दिलं उत्तर?

जेठमलानींनी केलेला दावा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंनी मात्र फेटाळून लावला. सामंत, भुसे, राठोड यांच्या सह्या बोगस होत्या आणि या बनावटगिरीला तुम्ही जबाबदार आहात, असा आरोप शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी केल्यानंतर प्रभूंनी उत्तर दिले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “ही पद्धत पक्षपाती”, ठाकरे गटाचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

“मला या कठड्यात आणून गुन्हेगार बनवलं जात आहे. रवींद्र वायकरांनी ठराव मांडला होता. त्यावर सर्वांनी सह्या केल्या. त्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांच्या सह्यांचे रजिस्टर मी अध्यक्षांना दिले आहे. हवे असेल, तर पुन्हा सादर करू शकतो. त्यात सामंत, भुसे, राठोड यांच्या सह्या आहेत. मी घटनेची शपथ घेऊन सांगतोय. खोटं कसे काय बोलू शकतो?”, असा उलट सवाल प्रभूंनी शिंदे गटाच्या वकिलांना केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT