Women Reservation Bill : विधेयक आणलं, पण महिला राष्ट्रपतींनाच…, राऊतांचा मोदींवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनातील कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महिला विधेयकाची घोषणा केली. त्या विधेयकाचे स्वागतही करण्यात आले. मात्र खासदार संजय राऊत यांनी त्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. महिला विधेयक आणलं असलं तरी नव्या संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमात मात्र महिला राष्ट्रपतींनाच डावलण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनामध्ये विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाची (Women Reservation Bill) घोषणा केली. त्यानंतर देशात महिलावर्गासह सर्वत्र त्याचे स्वागत करण्यात आले. मात्र त्यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाच्या विधेयकाची जोरदार घोषणा केली मात्र ज्या नव्या संसद भवनाचा पहिला दिवस होता, त्या संसद भवनाच्या उद्घाटनाला मात्र महिला राष्ट्रपतीला डावलण्यात आले. यावेळी संजय राऊत (sanjay raut) यांनी महिलांच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित करुन महिला आरक्षण राजकारणामध्ये कशा पद्धतीने राबवले जाणार ते महत्वाचे असणार असं मत व्यक्त केले आहे. (prime minister narendra modi announced womens bill but skipped inauguration new Parliament building for woman President)
ADVERTISEMENT
कायदे करुनही निर्भयांचे बळी
देशात एकीकडे महिला आरक्षणावर जोरदार चर्चा करुन महिला आरक्षण विधेयकाची घोषणा करण्यात आली. मात्र देशातील महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे देशात महिलांसाठी अनेक कायदे करुनही निर्भयांचे बळी जात असल्याचे चिंता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा >> Rain Update : राज्यात पुढचे तीन दिवस पाऊस, पण मराठवाड्यात…
न्याय कधी मिळणार
महिला विधेयकामुळे महिलांना राजकारणात मोठी संधी मिळाली, त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते अगदी लोकसभेपर्यंतच्या राजकारणात महिलांच्या राजकीय नेतृत्वाला संधी मिळत गेली. मात्र घराणेशाहीमुळेही त्याचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगत त्यांनी सांगितले की, बाळासाहेब म्हणत होते की, 33 टक्के आरक्षणापेक्षा 33 टक्के महिला राजकीय पक्षातून निवडून कशा येतील याकडे लक्ष देणे, तशी राजकीय पक्षावर बंधनं घालणे गरजेचे आहे अशी बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी आठवण सांगितली.
हे वाचलं का?
महिला राष्ट्रपतींना डावलले
नव्या संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला विधेयकाची घोषणा केली. मात्र संसदेच्या पहिल्या दिवशी एवढे मोठे विधेयक आणतानासुद्धा नरेंद्र मोदी यांनी देशाच्या महिला राष्ट्रपतींना या कार्यक्रमाला डावलण्यात आले. त्यांच्या हस्ते जर नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाले असते तर देशातील महिलावर्गाला आणखी बळ मिळाले असते असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
2024 मध्ये सरकारला पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारकडून अनेक नवनवे निर्णय घेण्यात येत आहेत. काही निर्णय घाईगडबडीने घेतले जात आहेत. कारण या सरकारला येत्या 2024 मध्ये पूर्णविराम मिळणार असल्याने मोदी सरकारकडून अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा धडाका लावला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Cricket : क्रिकेट विश्व हादरलं, मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं कोण?
विरोध करणार नाही
महिलांच्या विकासासाठी सरकार निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करण्याचे काम नाही. कारण चांगल्या निर्णयामुळे महिलांच्या अस्तित्वाला चालना मिळत असेल तर ती देशासाठी चांगलीच गोष्ट आहे असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT