Sanjay Raut on Nitin Desai: ‘सनी देओलचं घर वाचलं, मग नितीन देसाईंचा…’, राऊतांचा घणाघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay raut sunny deol and nitin desai loan
sanjay raut sunny deol and nitin desai loan
social share
google news

Sanjay Raut on Nitin Desai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपसह नेत्यांवर त्यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी बड्या उद्योगपतींना भाजपकडून कशा पद्धतीने मदत केली जाते, हजारो कोटींची कर्ज माफ करुन बँकांची कर्ज कशी बुडवली जात आहेत. त्यावर बोलत त्यांनी सनी देओल (Sunny Deol) बँका एक न्याय देतात तर महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले कला दिग्दर्शक नितिन देसाई यांना एक न्याय केला जातो असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. (mp sanjay raut criticizes bjp over Nitin Desai suicide auction of Sunny Deol house)

ADVERTISEMENT

मराठी कलाकाराची दया नाही

संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी कलादिग्दर्शक नितिन देसाई यांनी एनडी स्टुडिओवर झालेल्या कर्जामुळे दिल्लीत जाऊन भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. एनडी स्टुडिओ वाचवण्यासाठी भाजपच्या नेत्यांसमोर अश्रूही ढाळले मात्र त्यांना एका मराठी कलाकाराची दया आली नाही. तर दुसरीकडे सनी देओल यांनी 60 कोटीचे कर्ज फेडू शकले नाहीत, म्हणून बँकेने त्यांच्या घराचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र सनी देओल भाजपचे खासदार असल्यामुळे आणि भाजपचा स्टार प्रचारक असल्याने त्यांच्यावर झालेली कारवाई थांबवण्यात आली. त्यामुळेच संजय राऊत यांनी भाजपच्या जवळच्या माणसांना एक निर्णय तर दुसऱ्यांना दुसराच निर्णय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा >>Ajit Pawar: ‘PM मोदींविरोधात सभा घेऊन…’,बारामतीतून अजित पवार काय म्हणाले?

सनी देओलचा बंगला वाचला

नितिन देसाई यांनी आपला स्टुडिओ वाचवण्यासाठी अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र त्यांची भाजपला दया आली नाही. तर दुसरीकडे मात्र सनी देओलच्या बंगल्याचा होणारा लिलाव भाजपने एका रात्रीत थांबवण्यात आला. त्यामुळे भाजपकडून वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचाराला चालना दिली जात असल्यामुळेच 2024 मध्ये ते सत्तेत येणार नाहीत असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

हिंदुत्व कोणी शिकवायचे

आज सामनामधूनही त्यांनी सनी देओल यांच्या घरावरच्या होणाऱ्या जप्तीवरून रोखठोकमधून फसवाफसवी नवे बुद्धिबळ, हिंदुत्व कोणी शिकवायचे यामधून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. भाजपने नितिन देसाईंचे स्वप्न वाचवले नाही असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या द्वेषाच्या राजकारणासह भ्रष्टाचाराला भाजप कशा पद्धतीने चालना देत आहेत. त्यावरही त्यांनी बोट ठेवले आहे.

हे ही वाचा >> MNS Jagar Padyatra: अमित ठाकरे म्हणाले पुढच्या वर्षी राज ठाकरेंची सत्ता येईल, तेव्हा…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT