Narayan Rane: 'पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं...' राणेंची पवारांवर जहरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: सिंधुदुर्गातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या प्रकरणी महाविकास आघाडीने काल (1 सप्टेंबर) जे जोडे मारो आंदोलन केलं त्यानंतर आता भाजपने या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. आज (2 सप्टेंबर) नारायण राणे यांन पत्रकार परिषद घेत शरद पवारांवर अत्यंत जहरी टीका केली आहे. 'पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं', असं म्हणत राणेंनी शरद पवारांवर टीका केली आहे. (narayan rane has criticized sharad pawar in a press conference in the case of statue of chhatrapati shivaji maharaj)

नारायण राणे यांची शरद पवारांवर घणाघाती टीका

'आता शरद पवार या वयातही महाराष्ट्रात शांत, सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाहीत. आजही लावालावी करतायेत. जातीजातीत तेढ निर्माण व्हावं.. चार वेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मंत्री असताना त्यांनी आरक्षणाची टक्केवारी नाही वाढवली. आता करतायेत टक्केवारी वाढविण्याची मागणी करत आहेत.'

हे ही वाचा>> Sharad Pawar : "शिवरायांची तुलना सावरकरांशी...", शरद पवारांनी PM मोदींना सुनावलं

'चार वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते.. का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे.. तुम्ही चालत येता आणि पेटवता लोकांची मनं. का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढला? जातीचं राजकारण नको..' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'पुतळा पडला चला आपण एकत्र येऊन यापेक्षा चांगला, देखणा पुतळा तयार करू. असं बोलला असतात तर तुमची किर्ती वाढली असती ओ.. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायेत.' 

'वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वत:च्या जातीला न्याय देऊ शकलात नाही. आता ज्यांना घुसला आहात ना.. मला पण माहिती आहे.' 

ADVERTISEMENT

'एक मला फोन आला सुरुवातीलाच.. जरांगेचं आंदोलन चालू झालं फोन आला.. पहिल्यांदाच.. मला फोन केला आणि काहीही बोलायला लागला होता. शिव्या वैगरे.. मी त्याला म्हटलं तुझा पत्ता दे मी येतो घरी.. नंतर मी नंबर दिला आमच्या पीएला आणि सांगितलं पोलिसात कळवं. तो कोणाला निघाला तर शरद पवारांचा कार्यकर्ता.. चव्हाण.. हे खेळ का खेळता? हे खेळ आमचे वरिष्ठ खेळतात..'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Jaydeep Apte ने शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये का दाखवलेला 'तो' घाव?, ती पोस्ट अन्...

'छत्रपतींचा हा महाराष्ट्र... लोककल्याणकारी बनावा हे ध्यानीमनी पवारांच्या असावं. आमच्यासारख्या सांगायला हवं की, वाद नको बसू आपण.. चला पुतळा पुन्हा बसवूया.. मी तुम्हाला चांगला ओळखीचा शिल्पकार देतो. बोला ना कोण नाही म्हणणार आहे?'

'पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं...  याला महाराष्ट्रात स्थान नाही.'

'महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण... उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांना काही वाटत नाही?' असं विधान नारायण राणे यांनी केलं आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT