Narayan Rane : ''कपडे काढले तरी...'', जरांगेंवर पलटवार करताना राणे काय बोलले?
Narayan Rane News : नारायण राणे यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे. मनोज जरांगे पाटील माझ्या स्वागताला येत असतील तर त्यांचे आभार व्यक्त करतो. असे म्हणत लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर आपण मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जरांगे पाटील आणि नारायण राणे यांच्यात शाब्दीक युद्ध
नारायण राणे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार
नारायण राणेंचा मनोज जरांगेंवर पलटवार
Narayan Rane Reply Manoj Jarange Patil : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्या शाब्दीक युद्ध रंगले आहेत. या शाब्दीक युद्धात आता नारायण राणे (Narayan Rane) यांनी मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) जोरदार पलटवार केला आहे. ''दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही. त्याच्या अंगामध्ये तसे गुण असायला लागलात'',असे म्हणत भाजप खासदार नारायण राणे यांनी मनोज जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (narayan rane reply manoj jarange patil maratha reservation maharashtra politics)
सिंधुदुर्गात नारायण राणे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी जरांगेच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे. कोणात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे म्हणत नारायण राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले होते. मात्र, नारायण राणे मराठवाड्यात येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे, म्हणत जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. यावर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे. मनोज जरांगे पाटील माझ्या स्वागताला येत असतील तर त्यांचे आभार व्यक्त करतो. असे म्हणत लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर आपण मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे.
हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: 1500 रुपयांसाठी तुमच्या अर्जासमोर नेमकं काय असायला हवं?
नारायण राणे पुढे म्हणाले, राणे साहेब मराठवाड्यात येतातय, येऊ दे, आमच्याकडे काय बघणार, आम्ही कपडे घालतो, असे विधान जरागेंनी सोलापूरमध्ये केल्याचे सांगत, राणे म्हणाले, ''अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो, तुझ्यात आहे काय बघण्यासारखं?'' अशा शब्दात राणेंनी जरांगेंची खिल्ली उडवली. तसेच ''दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही. त्यांच्या अंगामध्ये तसे गुण असायला लागलात'',असे म्हणत भाजप खासदार नारायण राणे यांनी मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Udhhav Thackeray : ठाकरेंना मोठा झटका? दिल्ली दौऱ्याची Inside Story
''बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना संपली, (ठाकरे) काय बोलतो हा, आमच्या देवेंद्रना शिव्या घालतो. पण देवेंद्रांनी त्यांच्यावर पलटवार केला का? याला म्हणतात सज्जनपणा, ते सालस आहेत, बुद्धीमत्ता आहे. सरकार कसं चालवावं हे त्यांना कळतं. त्यामुळे वेड्यांच्या नादी कुठे लागलात, शिव्यांना उत्तर द्यायला. उद्धव ठाकरेंची चांगली मानसिक स्थिती नाही, असी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.मी होतो ना 39 वर्ष त्याला काय येतं. काही येत नाही. त्यामुळे हे दुकान बंद करा आणि एकच कमळ फुलू दे ना'', असे आवाहन राणेंनी यावेळी केले.
ADVERTISEMENT