मुंबई Tak बैठक: ‘तू आणि उद्धव ठाकरे मी असेपर्यंत..’ राणेंनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा
Narayan Rane Balasaheb Thackeray: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयीचा किस्सा सांगताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
Narayan Rane Mumbai Tak Baithak: मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ‘मुंबई Tak बैठकी’त (Mumbai Tak Baithak) बोलताना शिवसेना (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. पण यावेळी नारायण राणे यांनी दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांबाबतचा एक खास किस्साही सांगितला. यावेळी राणेंनी शिवसेना सोडताना बाळासाहेबांनी त्यांना उद्धव ठाकरेंबाबत नेमकं काय सांगितलं होतं याविषयी माहिती दिली. (narayan rane told an anecdote about balasaheb thackeray see what exactly he said about uddhav thackeray in mumbai tak baithak)
ADVERTISEMENT
‘साहेबांना मी जेव्हा सांगितलं की, साहेब मी बाजूला होतोय.. मी शिवसेना 2005 च्या आधी सोडायच्या अगोदर.. या-या गोष्टी मला पटत नाही.. मी कुठे जात नाही.. मी माझे व्यवसाय सांभाळतो. पण मी निघालो.. तेव्हा साहेब मला म्हणाले की, तू कुठेही जायंच नाही… कारण मी थकलोय. उलट मला सोडवा.. तेव्हा साहेब मला एक वाक्य म्हणाले. नारायण तू आणि उद्धव.. मी जिवंत असेपर्यंत तुमच्या दोघांमध्ये मतभेद नको..’ असं म्हणत नारायण राणे यांनी बाळासाहेबांविषयीचा किस्सा सांगितला.
नारायण राणे.. उद्धव ठाकरे अन् बाळासाहेब..
‘शिवसेना पक्ष हा ठाकरे या आडनावाशी जोडला जातो. हे सोयीचं राजकारण आहे. आवश्यकता नाही. साहेबांनी कधीही सांगितलं नाही की, माझ्यानंतर घराण्यातच शिवसेनाप्रमुख पद द्या हे केव्हाही बोलले नाहीत. साहेबांना मी जेव्हा सांगितलं की, साहेब मी बाजूला होतोय.. मी शिवसेना 2005 च्या आधी सोडायच्या अगोदर.. या-या गोष्टी मला पटत नाही.. मी कुठे जात नाही.. मी माझे व्यवसाय सांभाळतो. पण मी निघालो..’
हे वाचलं का?
‘तेव्हा साहेब मला म्हणाले की, तू कुठेही जायंच नाही… कारण मी थकलोय. उलट मला सोडवा.. तेव्हा साहेब मला एक वाक्य म्हणाले. नारायण तू आणि उद्धव.. मी जिवंत असेपर्यंत तुमच्या दोघांमध्ये मतभेद नको.. तर मी म्हटलं की, साहेब मतभेद असण्याचा प्रश्न नाही. पण मला काही अनुभव येतायेत ते चांगले नाहीत. तुम्ही तर म्हणता बाजूला होतो.. पण तुम्ही प्रत्येक गोष्ट झाली की उद्धवकडे पाठवता मला नाही पटत.. त्याची नाही क्षमता तेवढी. समजून घ्यायची.. मी उघड बोललो.. म्हणून साहेब हे साहेब होते. त्यांची बरोबरी होऊ शकत नाही.’
‘उद्धव ठाकरेंकडेही शिवसेना घडविण्याचं काम कोणीही करू शकत नाही. तसा शिवसेना निपजणं कठीण, मिळणं कठीण.. तशी निष्ठा.. प्रामाणिकपणा तेव्हाच्या शिवसैनिकात होती ती आजच्या शिवसैनिकात नाही.’
ADVERTISEMENT
अधिक वाचा – ‘माझं मेस्सीसारखं झालंय’, एकनाथ शिंदेंवर घणाघात, आदित्य ठाकरे काय म्हणाले?
‘ओरिजनल म्हटलं की समोरच्यांना राग येतो.. कारण त्यांना वाटतं की, ठाकरे म्हणजे ओरिजनल.. पण ते डुप्लिकेट आहेत कोणालाच नाही माहित.. पण आम्हाला माहिती आहे ना.’
ADVERTISEMENT
‘आता एक तुम्हाला सांगतो.. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कसे झाले.. आमदार 145 होते का? नाही.. 56 होते. त्यांनी आघाडीशी जुळवून घेतलं. पण बाळासाहेब शिवसेना पक्षाचं हिंदुत्व सोडून पदासाठी तडजोड करतील हे अशक्य होतं. साहेब असते तर उद्धव ठाकरेला कधीही मुख्यमंत्री केलं नसतं. वडील म्हणतो पण त्यांचे गुण कुठे घेतो, विचारधारा कुठे घेतो?’
‘हिंदुत्व हा साहेबांचा प्राण होता. त्याचा त्याग करून तर मुख्यमंत्री पद मिळवलं. यांनी साहेबांचं नाव सांगू नये की, बाळासाहेब माझे वडील होते. तू मुलगा होतास तर तुला डावलून मला कसं मुख्यमंत्री केलं होतं बाळासाहेबांनी? तेव्हा होता ना उद्धव..’
‘उद्धव ठाकरेंना आता कळलं असेल राष्ट्रवादी कशी.. काँग्रेस कशी.. कधी सोनिया गांधींना भेटायला जातात. पूर्वी बाळासाहेब तर.. मी नाही ऐकलं की साहेब कोणाच्या घरी गेले भेटायला.. हे आता दारोदार फिरतायेत.. शिवसेना संपली आहे..’ असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर तुफान टीकाही केली.
आता नारायण राणे यांच्या या टीकेनंतर शिवसेना (UBT)पक्षाचे नेते आता राणेंना कसं प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT