NCP: ‘आमदारांना भेटायचं असेल तर भेटू दे, पण मी..’, शरद पवारांचं मोठं विधान
अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, काहीही झालं तरी भाजप सोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
ADVERTISEMENT
Latest Political News Maharashtra: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानक 2 जुलै 2023 रोजी पक्षात बंड केलं. त्यांच्यासोबत 9 दिग्गज आमदारांना (NCP MLA) सोबत घेऊन त्यांनी त्याच दिवशी स्वत: सोबत सगळ्यांच्या मंत्रिपदाचा शपथविधी देखील उरकून घेतला. एवढंच नव्हे तर त्याच्या तीन दिवसांनंतर एक जाहीर कार्यक्रमही घेतला. ज्यामध्ये अजित पवारांसह अनेकांनी थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) हल्लाही चढवला. मात्र, शरद पवार यांनी अगदी मुरब्बीपणे ही परिस्थिती हाताळली. हीच गोष्ट अजित पवार यांच्या गटासाठी आता अडचणीची ठरत असल्याचं सध्या दिसतं आहे. अशावेळी आता सलग दोन दिवस अजित पवार हे मंत्री आणि आमदारांना घेऊन शरद पवार यांना भेटत आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आणि विशेषत: शरद पवार यांच्याविषयी गूढ वातावरण तयार झालं आहे. (ncp ajit pawar group mlas met sharad pawar 17 july 2023 Pawar clarified is no question of going with the bjp news on maharashtra politics)
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या कृतीला शरद पवार यांचा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वत: राज ठाकरेंनी देखील याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. अशातच सलग दोन दिवस मंत्री आणि आमदारांच्या पवारांसोबत ज्या भेटीगाठी सुरू असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका काय असेल हे स्पष्ट केलं आहे.
अजित पवार गटाचे मंत्री भेटीसाठी आल्यानंतर शरद पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.
हे वाचलं का?
अजित पवार समर्थक आमदारांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले की..
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या गटाची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या नेत्यांची आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भेट घेतली. या बैठकीत 8 ते 10 आमदार उपस्थित होते.
हे ही वाचा >> समर्थक आमदारच अजित पवारांवर भडकले; भेटीआधी काय घडलं? Inside Story
या बैठकीत शरद पवारांनी पुन्हा एकदा आमदारांना सांगितलं की, त्यांना येऊन भेटायचे असेल तर भेटू द्या.. पण आपल्या भूमिकेवर आपण कायम आहोत. भाजप सोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं स्पष्टपणे शरद पवारांनी यांनी आपल्या आमदारांना सांगितलं.
ADVERTISEMENT
यामुळे तूर्तास तरी शरद पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता एक प्रकारे एक अडचणीची परिस्थिती अजित पवार गटासाठी निर्माण झाली आहे. अशावेळी ही कोंडी कशी फुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
शरद पवारांना भेटल्यानंतर प्रफुल पटेल नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, शरद पवार यांची आमदारांनी भेट घेतल्यानंतर अजित पवार यांच्या गटाचे नेते प्रफुल पटेल म्हणाले की, ‘काल जसं मी म्हटलं होतं की, तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एकसंध राहावा त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशी विनंती त्यांना केली.’
हे ही वाचा >> ‘महिनाभर थांबा, तुम्ही पण भाजपत येणार’, विधानसभेत गिरीश महाजनांचा नवा बॉम्ब
‘काल मी सांगितलं होतं की, आमचं जे काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलं. तसं आजही त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यानंतर जे काही असेल त्याबाबत मी आज कसं बोलू शकतो की, त्यांच्या मनात काय आहे?’
‘आम्ही पवारसाहेबांना विनंती केली.. त्यांनी आमचं म्हणणं आजही ऐकून घेतलं जसं त्यांनी काल ऐकून घेतलं. आज देखील त्यांनी आमचं म्हणणं ऐकल्यानंतर ते पुढे काही बोलले नाही. पण चांगल्या पद्धतीने त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं.’ अशी प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT